जिजाऊ संघटना बोईसर अध्यक्ष नरेश धोडी याचा कार्यकर्त्याच्या पत्नीवर बलात्कार- पीडित महिलेची तक्रार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Aug 2023, 9:52 AM
   

पालघर- विवाहित प्रेयसी सोबत शरीर संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन प्रियकर आणि त्याच्या मित्राने एका 34 वर्षीय विवाहित महिलेवर मागील 5 वर्षांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पालघर मधील बोईसर येथे समोर आली आहे  . 
    बोईसर च्या बेटेगाव परिसरातील हा धक्कादायक प्रकार असून यानंतर तीन आरोपींविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात 376 (2) (n) ,  66 (e) , 67 (अ ) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पीडित 34 वर्षीय विवाहित महिलेचे याच परिसरात राहणाऱ्या सागर धोडी याच्याशी प्रेम संबंध असून या संबंधातून त्यांच्यात वारंवार शरीर संबंध देखील आले होते.  मात्र याचाच फायदा घेऊन सागर धोडी याने अश्लील चित्रफीत तयार करून त्यानंतर पीडित विवाहित महिलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले . हाच व्हिडिओ आरोपीने नरेश धोडी याला दिला असून ही अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देत नरेश धोडी याने देखील तिच्यावर तीन वेळा अत्याचार केल्याचं पीडित महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटल आहे . पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत . नरेश थोडी हा पालघर मधील जिजाऊ संघटनेचा पदाधिकारी असून पीडित महिलेच्या सासूवर रुग्णालयात उपचार करण्याच आमिष देऊन नरेश थोडी याने पिडीतेशी जवळीक साधल्याचं पीडित महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटलय .
   महिला सक्षमीकरण करणारी जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी महिलेवर बलात्कार करतात हे आज काही पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे.अशी सर्व कडे चर्चा सुरू असल्याचे ऐकावयास मिळत आहे
   हबीब शेख याला अटक केल्यानंतर जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजले की खासदार राजेंद्र गावित काम करत नाही. जर का खासदार काम करत नसेल म्हणून म्हणून खोटे लेटरहेड बनविणे कितपत योग्य? हा जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे.
      योगेश धोडी हा ही जिजाऊ संघटनेचा एक कार्यकर्ता असुन त्याच्या आईला झालेल्या कॅन्सरच्या आजारावर रू.1,35,0000/-खर्च झाला. आणि त्याची आई दोन दिवसातच मयत झाली. ह्या बाबतीत त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायर केला त्यानंतर हे सर्व प्रकरण घडले असल्याचे पीडित महिलेचे पती योगेश धोडी याने आपल्या मुलाखतीत सांगितले.

    Post Views:  345


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व