रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट व स्वस्तीक गृहनिर्माण संस्थावतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Jul 2024, 12:12 PM
   

दिनांक 21 जुलै 2024 रविवारला गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट व स्वस्तिक गूहनिर्माण संस्था केशवनगर अकोला च्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम केशवनगर अकोला येथे हनुमान मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाला.
     सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ अकोला चे अध्यक्षा सौ. पुनम अशोक मुंदडा व स्वस्तिक गूहनिर्माण संस्था केशवनगर अकोलाचे अध्यक्ष अँड.श्रीनिवासजी खोत यांच्या हस्ते बहुगुणी आणि दिर्घआयुषी कडूलिंबाच्या झाडाचे पूजन व वूक्षारोपन करण्यात आले.
     रोटरी क्लबचे आर सी.एडमीन सेक्रेटरी रमण जी राठी, प्रोजेक्ट सेक्रेटरी मनोज माळोदे साहेब स्वस्तिक गृहनिर्माण चे कोषाध्यक्ष मुरलीधर काळणे, सचिव दिनेश पांडे यांनीही वृक्षारोपण केले. तीस पस्तीस एकरात वसलेल्या आणि अवघे ५८ वर्षे वय असलेल्या केशवनगर अकोला येथे गेल्या अनेक वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष अँड. श्रीनिवास खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व सदस्य वृक्षारोपण करून फक्त झाडे लावतच नाही तर त्याचे संवर्धन करून त्यांच्या वाढदिवस सुद्धा साजरा करतात.
     रोटरी क्लबचे मा.डीजी श्री झुंनझूनवाला यांच्या हस्ते झाडांचा वाढदिवस सुद्धा साजरा केला. केशवनगर मधील प्रत्येक सदस्याच्या घरी किमान पाच ते दहा झाडे त्यांनी वाढवलेली आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये केशवनगर चे तापमान एक अंशाने कमीच असते. हजारो झाडे केशवनगर मध्ये आहेत.
      रोटेरीयन  शाम गोटफोडे साहेब, माटी के लाल टीमचे पावस सेंगर यांनीही झाडे उपलब्ध करून दिली .अँड.सुरेखा साहेब हे सुद्धा १०० झाडे माटी के लाल टीमला उपलब्ध देणार आहेत. स्वस्तिक व निर्माण संस्था केशवनगर अकोला अध्यक्ष अँड.खोत साहेब आणि पदाधिकारी सर्वश्री मुरलीधर काळणे, दिनेश पांडे, देशमुख साहेब,अँड.सुरेका साहेब,तुळशीराम झटाले ,विजय बाहाकर,टोपले साहेब, धांडे साहेब, गणेश बोधनकर,प्रसाद देशपांडे, यांनी रोटरी क्लब चे पदाधिकारी व सदस्यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चारही बाजूने वॉल कंपाऊंड हनुमान मंदिराच्या प्रांगणात वाकिंग ट्रॅकचे बाजूला रोटरी क्लबच्या उपस्थित असलेल्या प्रत्येक सदस्य तथा स्वस्तिक गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांनी वृक्षारोपण केले. विविध प्रकारच्या 51 झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वस्तिक गृहनिर्माण संस्थेने घेतली आहे. त्याला माती के लालचे पावस सेंगर आणि टीम मदत करणार.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रोटे.अँड.श्रीनिवास खोत यांनी करून संस्थेने आतापर्यंत केलेल्या केलेल्या वृक्षारोपणा बाबत माहिती दिली, तसेच रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट च्या अध्यक्षा रोटे. पूनम मुंदडा, उज्वल दुबे, पावस सिंगर यांनी वृक्षारोपण बाबत आपले विचार मांडले.
    कार्यक्रमाला  प्रमुख पदाधिकारी तथा सर्वश्री रोटेरीयन डॉक्टर जयंतीलाल वाघेला, ओंकार गांगडे, शाम गोटफोडे,*संजय तडस, संजय पिंपरकर अशोक पांड्या, सौ भारती शेंडे, संजय साहेब, पुरुषोत्तम श्रावणी, संजय हेडा सौ.सुनीता हेडा, भूषण ताजणे, निशिकांत बडगे,आदी रोटेरियन हजर होते.
      स्वस्तिक गूहनिर्माण निर्माण संस्थेच्या वतीने सर्व उपस्थित सदस्यांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी गणेश बोधनकर ,प्रसाद देशपांडे संस्थेचे सचिव देशपांडे साहेब कर्मचारी गुरुदेव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव दिनेश पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे पदाधिकारी रोटेरीयन विजय बाहाकर यांनी केले.

    Post Views:  23


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व