ग्रीन अकोला मित्र मंडळातर्फे वृक्षारोपण


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Aug 2024, 8:49 AM
   

एक हजार वृक्ष संवर्धऩाचा संकल्प
(ईश्वर जैन) अकोला : शहरातील ग्रीन अकोला मित्र मंडळातर्फे विविध प्रजातींच्या एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज आहे. शहरात वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून ग्रीन अकोला मित्र मंडळाचे पदाधिकारी कुंदन पांडे, डॉ. सीमा तायडे, ईश्वर जैन, मंगेश थोप, नीलेश दोडके, श्रीराम पांडे, बंटी फाटे, पप्पू नवरे, हरिष फोकमारे आदींनी शहरात एक हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. त्यांतर्गत शनिवारी (ता.तीन) तोष्णीवाल लेआऊट परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. खडकी भागातील सामाजिक संस्थांना ग्रीन अकोला मित्र मंडळातर्फे 500 वृक्ष लागवडीसाठी देण्यात आल्याची माहिती जैन रेस्ट्रोचे संचालक ईश्वर जैन यांनी दिली.

    Post Views:  114


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व