समाजामध्ये नागरिक शक्ती प्रबळ होणे आवश्यक ! पद्मश्री डॉ.अभयजी बंग


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  16 Mar 2023, 12:29 PM
   

अकोला (गजानन हरणे) : सामाजमध्ये अनेक प्रश्न आहेत,समस्या आहेत आणि यावर उपाय काय,तोडगा काय आहे हासुध्दा एक मोठा प्रश्न आहेत. सर्व सामाजिक प्रश्न केवळ सरकार सोडवेल ही अपेक्षा चुकीची असून समाजातील सर्व स्तरातून एकत्रित चळवळीची, प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि त्याकरिता समाजामध्ये नागरिक शक्ती प्रबळ होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.अभय बंग यांनी केले ते जेष्ठ पर्यावरणवादी डॉ. गिरीशजी गांधी यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारोहा मध्ये बोलत होते.
 या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना डॉ.वेदप्रकाश मिश्रा म्हणाले की,  सहजता,सरलता व सुलभता व्यक्तीची  ही आभूषणे आहेत. ज्या व्यक्ती सहज,सरल व सुलभ असतात त्याच व्यक्ती समाज घडवू शकतात. व्यक्तीनी  दुसऱ्या करीता आदर्श बनण्यासोबतच  अनुकरणीय बनने आवश्यक आहे असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात पंडित शंकरप्रसादजी अग्निहोत्री म्हणाले की,सत्याचे अनुष्ठान,यशोगान,संप्रेषण करावे ज्यामुळे आपले विचार,विवेक, सदसदविवेकबुद्धी,मन व चित्त शुद्धी होऊन समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व तयार होतील व सामाजिक विकास होईल.त्यामुळे सत्याचे यशोगान करणे अत्यंत आवश्यक आहे असे ते म्हणाले.
 याप्रसंगी मा.डॉ. गिरीशजी गांधी  सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,मी गांधी विनोबांच्या विचाराने प्रेरित असून तेच माझे आदर्श व श्रद्धा स्थान आहेत.आपण आपले जीवन स्वाभिमानाने जगले पाहिजे पुढील व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्याच्यासमोर लाचार होऊ नये.  समाजासाठी जे कोणी चांगलं काम करीत असेल मग तो कोणत्याही पक्षाचा,जाती धर्माचा असो त्याला मदत केली पाहिजे तरच समाजाचा विकास होईल. यथा राजा तथा प्रजा हे दिवस आता संपले आहेत आता यथा प्रजा तथा राजा अशी परिस्थिती निर्माण होणे आवश्यक असे ते यावेळी म्हणाले.
 या कार्यक्रमात मा.डॉ.गिरीशजी गांधी यांचा शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना स्नेहभेट म्हणून रोख रकमेची थैली प्रदान केली असता त्यांनी ती रक्कम सेवाग्राम ट्रस्ट व इतर सेवाभावी संस्थेला अर्पण करणार असल्याचे जाहीर केले.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.नारायण निकम यांनी केले. यावेळी श्री वि.स जोग यांनी आपले  मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती फडणवीस, डॉ. चंद्रकांत कोठारे   यांनी केले तर सन्मानपत्राचे वाचन प्रा.अभाषेक सिंह यांनी केले तर आभार श्री. संदीप चिचाटे यांनी मानले. हया कार्यक्रमाचे आयोजन जय महाकाली शिक्षण संस्था,वर्धा तथा वर्धा जिल्ह्यातील विविध सामाजिक,सांस्कृतिक व साहित्यिक संघटनांनी संयुक्त विद्यमाने करण्यात आले यावेळी विविध संघटनांनी डॉ.गिरीश गांधी यांचे पुष्पगुच्छ शाल,श्रीफळ व भेटवस्तू  देऊन अभिष्टचिंतन केले.  यावेळी श्री.अनिल नरेडी,श्री.श्रीराम शर्मा,श्री संदीप चिचाटे,श्री.प्रकाश खंदार, प्राचार्य डॉ.गजानन जंगमवार, डॉ.धर्मेंद्र मुंदडा,डॉ.दीपक पुनसे,डॉ.नरसिंग यादव,डॉ.अनिल महल्ले, डॉ.ताकसांडे, श्री.गजानन दांदडे, श्री अरुण वसु, श्री.अभिजित रघुवंशी इतर प्राध्यापक व असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

    Post Views:  126


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व