लोकशाही आणि सामाजिक हक्कांच्या संरक्षणासाठी निकोप पत्रकारिता ही काळाची गरज


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पत्रकार दिन कार्यक्रमात मान्यवरांचे प्रतिपादन
 संजय देशमुख  2024-01-07
   



  • ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर चौबे यांचा सत्कार

         अकोला- पध्दतीने शासन प्रशासनाची समाजाभिमुख वाटचाल घटनात्मक पध्दतीने होऊन समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि लोकशाहीचे योग्य संवर्धन होण्यासाठी पत्रकारिता आणि त्या क्षेत्रातील पत्रकारांची निकोप साधना ही काळाची गरज आहे.त्यासाठी स्व.बाळशास्त्री जांभेकरांच्या आदर्श आणि संकेतांना अनुसरून पत्रकारांनी आपली लेखणी सतत समाजासाठी वापरली पाहिजे असे प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या अकोला येथील आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी केले.


            पत्रकार महासंघाकडून अकोला येथे स्व.बाळशास्त्री जांभेकरांना जन्मदिन म्हणून अभिवादन व पत्रकार दिन स्थानिक जैन रेस्ट्रो येथे संपन्न झाला. याप्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,व स्व बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करण्यात येऊन शहीद,जवान,अपघातातील व मराठा आंदोलनातील बळी आणि दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.अकोल्याच्या पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षांपासून योगदान देणारे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष व मार्गदर्शक नंदकिशोर चौबे यांना शाल ग्रामगीता व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


     संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख हे मुंबईत असल्याने पत्रकार महासंघाचे केन्द्रीय सचिव श्री राजेन्द्रबाप्पू देशमुख यांचे अध्यक्षतेखाली व अतिथी म्हणून केन्द्रीय मार्गदर्शक पदाधिकारी श्री पुष्पराज गावंडे व ज्येष्ठ सेवाव्रती प्रा.डॉ.संतोषभाऊ हूशे यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर चौबे,संघटनेचे कायदेविषयक मार्गदर्शक,अॕड नितीनजी धुत,अकोला जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष सागर लोडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
       यावेळी केन्द्रीय पदाधिकारी,सिध्देश्वरजी देशमुख अंबादास तल्हार,जिल्हा सहसचिव मनोहर मोहोड,गजाननराव देशमुख,दै.विदर्भ दुतचे संजय निकस,पंजाबराव वर,अशोकराव सिरसाट,संतोष धरमकर सौ.दिपाली बाहेकर,सतिश देशमुख (विश्वप्रभात)केन्द्रीय,विभागीय तथा जिल्हा पदाधिकारी आणि सभासदांची बहूसंख्येने उपस्थिती होती. 

    Post Views:  517


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व