अकोला येथील हरविलेल्या युवतीचा कसून शोध घ्यावा


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व नागरीकांची मागणी
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  07 Aug 2024, 9:52 AM
   

अकोला-  स्थानिक वानखडे नगर डाबकी रोड येथील एक १६ वर्षांची मुलगी रविवार दि.०४ ऑगस्ट पासून अचानक हलविली असून पोलिस तक्रारीनंतरही अपेक्षित गतीने या प्रकरणाचा अजूनही तपास सुरू झालेला नाही अशी डाबकी रोडवरील नागरीकांची तक्रार आहे.
       याबाबत सविस्तर वृत्त असे की वानखडे नगरमध्ये राहणारे स्वप्निल देशमुख यांची श्रावणी नावाची १६ वर्षिय मुलगी महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी रविवार दि‌ ०४ ऑगस्ट रोजी घराबाहेर पडली परंतू ती घरी परतली नाही.त्यामुळे वडीलांनी चिंतातुर होऊन जुळणे शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.श्रावणी ही डाबकी रोडवरील मांगीलाल शर्मा व एक्सप्लेन ट्यूशन क्लासची विद्यार्थीनी असून ती अत्यंत सुस्वभावी आणि धार्मिक प्रवृत्तीची आहे.ती मोबाईल सुध्दा वापरत नसून ती बेपत्ता होणे म्हणजे तिचे कुटूंबिय आणि समाजासाठी सुध्दा चिंताजनक विषय आहे.त्यामुळे यास गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमानपणे फिरवावीत अशी मागणी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ  व डाबकी रोड नागरीकांनी  केली आहे.

    Post Views:  859


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व