इलना सदस्यांचे बहुमत प्रकाश पोहरे यांच्यासोबत; १८ जुलै रोजी संघटनेची बैठक


माजी अध्यक्षाना सर्व कागदपत्रे सोपविण्याची मागणी
  विश्वप्रभात  14 Jul 2024, 10:21 PM
   

नवी दिल्ली : छोट्या आणि भाषिक वृत्तपत्र संघटना अर्थात इंडियन लँग्वेज न्यूजपेपर असोसिएशन (इलना) या संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक १८ जुलै रोजी नवीन महाराष्ट्र भवन, दिल्ली येथे  कार्यवाहक अध्यक्ष  प्रकाश पोहरे यांनी बोलावली आहे. त्याबद्दल कार्यकारिणी व सर्वसामान्य सदस्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
देशभरात पसरलेल्या मोठ्या भाषिक व छोट्या वृत्तपत्र चालकांच्या सहभागाच्या बातम्यांवरून आता या वर्गाचे वृत्तपत्र चालक व संपादक प्रकाश पोहरे व २००५ ते २०१० ह्या काळातील माजी राष्ट्रीय अध्यक्ष सुनील डांग त्यांना पूर्ण पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत.  खर्‍या अर्थाने या कठीण काळातही वृत्तपत्रे चालवणाऱ्या अनेक प्रकाशकांच्या मते, या काळात केवळ प्रकाश पोहरे आणि सुनील डांग हेच योग्य ठिकाणी प्रयत्न करून ज्या समस्या येत आहेत त्या समस्या सोडवू शकतात.
       या बैठकीच्या संदर्भात सुनील डांग यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपण पूर्णपणे प्रकाश पोहर यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, यावेळी गटबाजी करून दुफळी निर्माण करण्याऐवजी वृत्तपत्र चालकांचे प्रश्न सोडविण्याची गरज आहे. सुनील डांग हे अनेक वर्षे  इलनामध्ये सर्व पदे भूषवत राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वृत्तपत्र मालकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्री तसेच विविध विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन बरीच कामे केली. जेव्हा बातम्यांमधील एकसमानतेच्या नावाखाली मान्यता रद्द करण्यात आली तेव्हा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री सुषमा स्वराज आणि तत्कालीन राज्यमंत्री रमेश  यांची भेट घेऊन २० समस्या एकत्र सोडवून एक विक्रम कायम केला होता.त्यावेळी मंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात दीड डझन वृत्तपत्र चालकांमध्ये माजी अध्यक्ष परेश नाथ यांचाही समावेश होता.  सुनील डांग यांनी त्यांच्या कार्यकाळात  केंद्रीय माहिती मंत्री पी.डी. मुन्शी यांनी सर्वांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली. राष्ट्रपती, पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी इत्यादींसह अनेक केंद्रीय मंत्र्यांना  इलनाच्या परिषदांमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. मोठ्या चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी अध्यक्ष परेश नाथ यांना गेल्या पंधरा वर्षांत एकही मोठा कार्यक्रम आयोजित करता आला नाही.  परिणामी देशव्यापी कार्य असलेल्या इलणाचे महत्त्व कमी झाले, सदस्यांमध्ये निराशा पसरली होती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे २०१० च्या दरम्यान पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा  निवडणुका झाल्या आणि रवीकुमार बिष्णोई गटाचे सर्व सदस्य विजयी झाले आणि माजी अध्यक्ष परेश नाथ ह्याना अध्यक्ष करण्यात आले, तेव्हा सुनील डांग यांनी संबंधित सर्व फाईल्स आणि बँकेशी संबंधित कागदपत्रे  तात्काळ माजी अध्यक्ष परेश नाथ ह्यांना उपलब्ध करून दिले होते.. मात्र जवळपास १३ वर्ष अध्यक्ष राहल्या नंतर मागील वर्षी परेश नाथ ह्यांनी  स्वतःहून राजीनामा दिल्यानंतर प्रकाश पोहरे ह्यांना कार्यकारणी ने कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडले. मात्र  परेश नाथ ह्यांनी अद्यापही कुठलीही कागदपत्रे आणि बँक अकाऊंट श्री प्रकाश पोहरे यांच्याकडे का सोपविली नाहीत, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे. संघटनेला एक प्रकारे कमजोर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संघटनेला मजबूत करण्यासाठी माजी अध्यक्ष परेश नाथ  ह्यांनी तात्काळ संघटनेशी संबंधित कागदपत्रे आणि बँक खाते विद्यमान अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्याकडे सोपवावीत, असे आवाहन पत्रकाच्या माध्यमातून केले आहे. जे माजी सदस्य अथवा पदाधिकारी काही कारणामुळे नाराज आहेत अशा सदस्यांशी १८ जुलैच्या बैठकीपूर्वी चर्चा करून त्यांची नाराजगी दूर करण्यात यावी अशी विनंती कार्यकारी अध्यक्ष श्री प्रकाश पोहरे यांना प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे 

    Post Views:  46


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व