लोकस्वातंत्र्य महाराष्ट्रात झपाट्याने पसरत चाललेला गतिमान पत्रकार महासंघ
विचारमंथन मेळाव्यात देवकाताई व उपस्थितांचे सत्कार
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
29 Nov 2023, 8:40 AM
शहीद जवान, मराठा युवक आणि पत्रकार स्व.उत्तम धायजे यांना श्रध्दांजली,त्यांना आर्थिक मदत आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
अकोला - लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आपल्या पत्रकार कल्याण आणि सातत्यपूर्ण उपक्रमांनी महाराष्ट्रभर झपाट्याने पसरत चाललेली एक यशस्वी संघटना आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका व गझलक्रांती पुरस्कार विजेत्या देवकाताई देशमुख यांनी केले. पत्रकार महासंघाच्या व्दितीय समुहातील प्रथम विचारमंथन मेळावा तथा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी त्यांनी पत्रकारितेतून सुरू असलेल्या सामाजिक साधनेच्या अखंड प्रवासाला कारवा संबोधून भारतभरातील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी प्रथम पत्रकार महासंघाच्या सामाजिक साधनेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समाजोध्दारक संत गाडगे बाबा यांना हारार्पण आणि वंदन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी देवकाताई देशमुख यांना गझल प्रांतातील उल्लेखनिय योगदानामुळे प्राप्त गझलक्रांती पुरस्काराबध्दल पत्रकार महासंघाकडून ग्रामगीता, शाल, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.हारार्पण वंदन कार्यक्रमानंतर सर्वप्रथम कश्मिर चकमकीतील शहीद जवान, आरक्षण प्रश्नातील बळी गेलेले मराठा युवक तथा परभणीचे पत्रकार स्व.उत्तम धायजे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थित पत्रकार महासंघाचे विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख डॉ.शंकरराव सांगळे,नागपूर जिल्हा संघटक अरविंदराव देशमुख अकोला जिल्हा पदाधिकारी विजयराव बाहकर यांचाही त्यांच्या क्षेत्रातील कार्याबध्दल ग्रामगीता,सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.व्यासपीठावर प्रमुख उपस्थित सौ.जया भारती यांचेही स्वागत करण्यात आले. मागील २६ महिण्यांच्या नियमित मासिक कार्यक्रमांच्या यशस्वी समारोपानंतर हा व्दितीय समुहातील प्रथम विचारमंथन होता.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ग्रामीणचे नवनियुक्त अकोला जिल्हाध्यक्ष सागर लोडम व सहसचिव मनोहर लोडम यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.अध्यक्षिय भाषणातून संजय देशमुख यांनी दिनदर्शिका प्रकाशन, आगामी महाअधिवेशनाचे आयोजन व पत्रकार स्व.उत्तम धायजे यांना उपचारासाठी आर्थिक मदत आणि मृत्यूपश्चात त्यांच्या ३ मुलांच्या शिक्षणाकडे पत्रकार महासंघ लक्ष देणार असल्याचे सांगीतले. महाराष्ट्र संघटन,संपर्क प्रमुख भगीरथ बद्दर यांनी याबाबत त्यांच्या पत्नीला सांगून आश्वस्त केले असल्याची माहिती यावेळी दिली.
मनोज देशमुख यांच्या बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख उपस्थित डॉ.शंकररावसांगळे,अरविंदराव देशमुख,सौ.जया भारती आणि विजयराव बाहेकर यांनी पत्रकार महासंघाच्या नाविण्यपूर्ण सक्रियतेचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमाला केन्द्रीय सचिव राजेंद्र देशमुख,उपाध्यक्ष किशोर मानकर,पंजाबराव देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.राजाभाऊ देशमुख,अड.विजयराव देशमुख,अड नितीन अग्रवाल,अड.नितीन धुत,जयप्रकाश राव देशमुख,भामोदकर, डॉ .विनय दांदळे,के.व्ही.देशमुख अशोककुमार पंड्या,सतिश देशमुख,सागर लोडम,रविन्द्र देशमुख,सौ.निता पंड्या,सौ.दिपाली बाहेकर, सतिश देशमुख, उगवेकर,मनोहर मोहोड, डॉ.अशोक तायडे,अशोक सिरसाट,सुरेश भारती,प्रा.विजय काटे,देवीदास घोरळ,नरेन्द्र डंबाळे,गौरव देशमुख,सतिश लोखंडे,पंकज देशमुख,शिवचरण डोंगरे,अल्पोपहारानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. आभारप्रदर्शन विदर्भ विभागीय संघटन व संपर्क प्रमुख डॉ.विनय दांदळे यांनी केले.
Post Views: 310