नांदुरा शहरातील समाजकार्यात आलेले मोहनराव नावाचे वादळ क्षमले...


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  30 May 2022, 9:01 AM
   

मरावे परी कीर्ती रुपी उरावे असे म्हणतात....अश्याच पद्धतीने कीर्ती रुपी अफाट सामाजिक कार्याचा वसा मागे सोडून गेलेले , नांदुरा शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व....नेत्रसेवाव्रती , यशस्वी उद्योजक श्री यु.एस .आर मोहनराव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे....18 जून सन 1950 साली आंध्रप्रदेश मधील कृष्णा जिल्ह्यातील रेड्डीपालम या गावी त्यांचा जन्म झाला...त्यांना चार बंधू आणि एक भगिनी होते ....त्यांनी अत्यंत संघर्ष करून बी .कॉम .
बी.एल चे शिक्षण पूर्ण केले....1984 साली बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात कांदा व्यवसायाच्या निमित्ताने ते आलेत....त्यांनी शेतकऱ्याच्या शेत मालाला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांचा आदर कमावला....परिसरात यशस्वी उद्योजक म्हणून त्यांना नावलौकिक प्राप्त झाले...त्यांच्या प्रयत्नाने नांदुरा हे शहर कांदा आणि मिरची चे मार्केट म्हणून शेतकरी ओळखू लागले...त्यानंतर 1999 साली त्यानी श्री तिरुपती बालाजी संस्थान ची स्थापना केली त्या माध्यमातून  8 नोव्हेंबर  2001 साली त्यांनी जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते नांदुरा येथे जगप्रसिद्ध 105 फूट हनुमानजी मूर्तीची स्थापना  केली....पुढे त्यांनी संस्थेच्या माध्यमातून सुंदर भव्य दिव्य अश्या बालाजी मंदिराची स्थापना केली....सण 2017 साली संस्थेच्या माध्यमातून सर्व सुविधांनी सुसज्ज अश्या नेत्रालयाची स्थापना त्यांनी केली....आज विदर्भातील सर्व सुविधांनी सुसज्ज असे मोठे नेत्रालय म्हणून या नेत्रालयाची ओळख आहे....त्यांच्या संकल्पनेतून गोर गरीब रुग्णांची फक्त 10 रु मध्ये तपासणी येथे केली जाते....
नांदुरा शहरात त्यांनी लायन्स क्लब ज्ञानगंगा ची स्थापना केली...त्यामाध्यमातून सेकेडो नेत्रदान , देहदान मिळविण्याचे कार्य त्यांनी केले ...
सण 2009 मध्ये लायन्स क्लब मध्ये "रिजनल चेअर पर्सन " म्हणून  पदभार त्यानी सांभाळला...
आत्मसम्मान फाउंडेशन च्या माध्यमातून बेघर बेसहारा मनोरुग्ण , व्यसनाधीनाच्या पुनर्वसनासाठी  उभारण्यात आलेल्या  पुनवर्सन प्रकल्पाला त्यांची भरपूर मदत होती....त्यांच्या जीवनी मधून समाजाला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्या आत्मचरित्रावर आधारित "सालगडी ते मोहनराव " या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे....लवकरच या पुस्तकाचे ही प्रकाशन होणार आहे....परिसरात सामाजिक कार्यात खूप मोठा आदर्श त्यांनी उभा केला...त्यांच्या पश्चात एक मुलगा , पत्नी , तीन भाऊ असा परिवार आहे...त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे...त्यांच्या निधनावर परिसरात हळ हळ व्यक्त केली जात आहे....दिनांक 30 मे 2022 रोजी , संध्याकाळी 5 वाजता अंतिम यात्रा बालाजी निवास ,सातव नगर नांदुरा येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे....तिथून 105 फूट हनुमानजी मूर्ती येथुन संध्याकाळी 5.30 वा पार्थिव शरीर देहसंकल्प पूर्ती साठी पाठविले जाणार आहे....

    Post Views:  203


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व