बोरगांव मंजू (अशोक भाकरे) : बोरगांव मंजू येथील ३ जुगार अड्ड्यावर विशेष पथकाने छापा मारून २३आरोपींना अटक करून, २३,२५० रुपये, २१ मोबाइल १० कॅलक्यूलेटर , ०२मोटर सायकली व इतर वरली जुगाराचे रू.२ लाखह ५३ हजार २५० रपयाचे साहित्य जप्त केले. दि.०४ मार्च रोजी पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथक बोरगांव परिसरात गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करताना गुप्त बातमीदारांकडून हा सुगाव लागला.या कारवाईत यावलखेड़ सेतु केंद्राजवळ वरली खेळणारे आरोपी दिलीप दयादेव शेंडे, प्रदिप जनार्धन शिरसाठ , चंद्रमणि मधुकर मोहाडे, सदानंद मधुकर चराटे, आत्माराम गोंदाजी घुगे ,प्रभाकर महादेव लाइसें, दुर्योधन दशरथ पांडे , रविंद्र अवधूत खंडारे, पुंडलिक मल्हारी बोराटे, शालिकराम तुलशिराम नेसनतकर सर्व रा.यावलखेड या १० आरोपींजवळून ३६७१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्याप्रमाणे बोरगावातील तेलीपुरा चौकामधील जुगारावरील छाप्यात योगेश श्रीराम अकोटकर, आकाश पंजाब मेश्राम, विजय हिरालाल कनोजिया, दयनदेव अंबादास फुलके, आकाश चन्दु कनोजिया. रवि विजय कनोजिया या ६ आरोपींजवळून रू.९४४० नगदी ३४००० रू.किंमतीचे आठ मोबाईल,६०,००० रुपये किंमतीची मोटरसायकल मोटरसायकल असा १०४००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यायत आला. तर डौला चौकमधील वरली जुगारावरील छाप्यात मंगेश शामराव चिंचोलकर, रामभाऊ मधुकर विल्हेकर, सुधीर विष्णु पाटील, केशव लक्ष्मण विल्हेकर, निलेश साहेबराव बागडे, मनिष विलास बागडे, सर्व रा भीमनगर मालिपूरा यांच्या जवळून नगदी २०४० रुपये मोबाइल ८ कींमत ४५००० रुपये, मोटरसायकल १ कीमत ६०,००० कॅलक्युलेटर २० नग कीमत १०,००० असा असा १,१२०४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा *एकूण ३ रेड मध्ये २३ आरोपींविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करून नगदी २३,२५० रुपये, मोबाइल २१ नग १० कैल्कुलेटर , ०२ मोटरसायकल, वरली जुगाराचे साहित्य कींमत २,५३,२१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बोरगांव मंजू येथे गुन्हा नोंद करून पुढील तपास बोरगांव पोलिस करीत आहेत. सदर कार्यवाही मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्ये पथकाने बोरगांव येथे केली.
Post Views: 293