सी.ए.टी.सी.१०२ कॅम्पमध्ये एल.आर.टि. च्या एन.सी.सी. यूनिटला २३ मेडल प्राप्त


 विश्व प्रभात  01 Jun 2024, 8:45 AM
   


11महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन अकोला अंतर्गत दि. २० मे ते २९ मे २०२४ पर्यंत सी. ए. टी. सी. १०२ कॅम्पचे आयोजन  पीएम श्री. जवाहर नवोदय विद्यालय, बाभुळगाव येथे करण्यात आले होते. ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांच्या नेतृत्वामध्ये या कॅम्प मध्ये श्रीमती एल. आर. टि. कॉलेज अकोला, आर. एल. टि. कॉलेज अकोला, आर. डि. जी. कॉलेज अकोला, शिवाजी कॉलेज अकोला, पी.डी.के.व्ही. अकोला, जी. एम. कॉलेज मूर्तिजापूर, एम. इ. एस. कॉलेज मेहकर, एम. इ. एस. हायस्कूल मेहकर, नर्सिंग शाळा अकोट, बाक्लीवाल हायस्कूल वाशिम,  जिल्हा परिषद कान्हेरी, होलीक्रॉस शाळा अकोला, माउंट कारमेल शाळा अकोला, मिलिटरी स्कूल गायगाव, जी.एन.व्ही. वाशिम, स्कूल ऑफ स्कॉलर अकोला इत्यादी स्कूल व कॉलेज मिळून ४५० एन. सी. सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. १० दिवस चाललेल्या या कॅम्प दरम्यान कॅडेटला नेतृत्व, ओबस्टॅकल्स, फायरिंग, ड्रिल तसेच त्यांच्या कलागुणांना चालना देत विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या कॅडेट्सला देण्यात आल्या. तसेच वेगवेगळ्या  स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले. यामध्ये श्रीमती एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन. सी. सी. यूनिटच्या कॅडेट्सनी प्रत्येक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन अनेक स्पर्धेमध्ये उत्तम रित्या प्रदर्शन करून २३ मेडल प्राप्त केले. यामध्ये कॉर्पोरल धनश्री चव्हाण हिला फ्लॅग एरिया साठी गोल्ड मेडल, कॅडेट सिमरन इंगळे हिला कंपनी सीनियर साठी गोल्ड मेडल, कॅडेट उर्मिला बुंदेले हिला सोलो डान्ससाठी गोल्ड मेडल, कॅडेट नितिक्षा पांडे हिला डान्ससाठी गोल्ड मेडल, कॅडेट धनश्री दाणे हिला डिबेट साठी गोल्ड मेडल, कॅडेट सारिका यादव हिला आर्ट वर्किंगसाठी गोल्ड मेडल, कॅडेट यशस्वी खंडारे हिला फ्लॅग एरियासाठी गोल्ड मेडल, कॅडेट कल्याणी आमले हिला डिबेट साठी सिल्व्हर मेडल, कॅडेट हर्षा गायकवाड हिला कल्चरल साठी सिल्वर मेडल, कॅडेट कॅडेट साक्षी झटाले हिला कल्चरल साठी सिल्व्हर मेडल, कॅडेट लक्ष्मी सुळे हिला कल्चरल साठी सिल्व्हर मेडल, कॅडेट मानसी दळवी हिला फ्लॅग एरिया साठी सिल्व्हर मेडल, कॅडेट प्रेरणा गोतमारे हिला कल्चरल साठी  सिल्वर मेडल, कॅडेट श्रध्दा पांडे हिला ड्रॉइंग साठी सिल्व्हर मेडल, कॅडेट सानिका राजेधर हिला डी.एस.टी साठी सिल्व्हर मेडल, कॅडेट निशा अरुलकर हिला डी.एस.टी साठी सिल्व्हर मेडल, सार्जंट स्वराज बोधडे याला ड्रिलसाठी गोल्ड मेडल, कॅडेट यशवंत हरसुलकर ह्याला कॅम्प सीनिअर साठी गोल्ड मेडल, कॅडेट प्रेम अहिर याला गार्ड ऑफ ऑनर साठी सिल्व्हर मेडल, कॅडेट त्रिषभ कोकाटे ह्याला डान्स मध्ये गोल्ड मेडल, कॅडेट सोकांश धवाणे ह्याला डान्स मध्ये सिल्व्हर मेडल, कॅडेट क्रिश करावडिया ड्रॉइंग साठी सिल्व्हर मेडल, आणि कॅडेट अविनाश वाकोडे ह्याला फ्लॅग एरिया मध्ये सिल्व्हर मेडल देऊन सन्मानीत केले गेले. मेडल प्राप्त सर्व कॅट्सचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जी. जी. गोंडाने, एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर व आय. क्यू. ए.सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल यांनी कौतुक करून त्यांचा उत्साह द्विगणित केला. कॅडेटच्या या कामगिरीबद्दल दि. बीजीई , सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंहजी मोहता, उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, उपाध्यक्ष इंजि. अभिजित, परांजपे, मानद सचिव पवन माहेश्वरी, सहसचिव सीए विक्रम गोलेच्छा व समस्त कार्यकारी सदस्यांनी एन.सी.सी. कॅडेट्सचे कौतुक करून अभिनंदन केले.

    Post Views:  125


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व