जागतिक पर्यावरण दिन साजरा


 संजय देशमुख  2024-06-06
   

जागतिक पर्यावरण दिन साजरा :एक औषधी वृक्ष निरोगी आरोग्यासाठी शाश्वत विकासासाठी,संपन्न देशासाठी" या ब्रीदवाक्याला अनुसरून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा व विद्यापीठ हायस्कूल प्रशालेच्या वतीने संयुक्तपणे प्रशालेच्या आवारात जागतिक पर्यावरण दिन व बाया कर्वे यांच्या जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रीय सह सुविधा केंद्र पश्चिम वनस्पतीशास्त्र विभागातर्फे औषधी वनस्पती देण्यात आल्या. 



वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, शिशुविहार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विजया बराटे, सुभाष कांबळे, परेश इंदापूरकर, सुजाता शिंदे, मंदाकिनी काशीद, विजय भायगुडे, अनिता कुऱ्हाडे, तसेच पालक, विद्यार्थी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रशालेच्या आवारात अर्जुन, आवळा, बिबा... यासारख्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.

    Post Views:  134


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख