महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करा- बसपा ची मागणी


 संजय देशमुख  16 Dec 2024, 9:56 PM
   

पालघर दि. १६ - बहुजन समाज पार्टी च्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावतीजी यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्याचे प्रभारी माजी खासदार मा. सिध्दार्थ गौतम जी तसेच महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष मा. सुनीलजी डोंगरे यांच्या मार्गदर्शनात बहुजन समाज पार्टी पालघर जिल्हयाच्या वतीने जिल्हाधिकारी मा. गोविंद बोडके यांच्या व्दारे भारताच्या राष्ट्रपती सौ. द्रौपदी मुर्मु यांनी निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये परभणी येथे पोलिसांचा वापर करून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांचा खून केल्याचा आरोप बहुजन समाज पार्टी कडून करण्यात आला आहे.

संपूर्ण देशभर मागील १० वर्षा पासून बीजेपी शासित राज्यात हिंसा, जाळपोळ, गोळीबार आणि बलत्कार सारख्या हजारो घटना घडत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये मागील आठवड्यात बीजेपी पक्षाचे नव्याने सरकार स्थापन होताच एका देशद्रोही व्यक्तीने परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना केली. सदरच्या कृती विरोधात परभणीतील संविधान प्रेमी जनतेने निषेध व्यक्त केला.

परंतु सदरचा निषेध व्यक्त करत असतांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून शेकडो दलितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अमानुषपणे मारहाण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत.

      या प्रकरणातील गंभीर बाब अशी की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी अमानुषपणे व क्रूरपणे मारहाण करून त्यांचा जीव घेतला.
 
     या घटने वरून बीजेपी सरकार मध्ये दलित विरोधी असलेली भयंकर स्वरूपाची घृणा, तिरस्कार व अमानुष प्रकारची क्रूरता साक्ष देते की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये राज्यातील सर्व संविधानप्रेमी दहशत आणि असुरक्षित च्या वातावरणात जगत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे. तसेच ज्यांनी संविधानाची विटंबना केली त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. पोलिसांनी क्रूरपणे मारहाण करुन शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांचा खून केल्याबद्दल संबंधित सर्व पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. महाराष्ट्र राज्यामध्ये तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करावे. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना एक करोड रुपये आर्थिक मदत व त्यांच्या कुटू़बात सरकारी नोकरी देण्यात यावी. तसेच सर्व भीम सैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. अशा सर्व संविधान प्रेमी जनतेची महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे मागण्या करण्यात आल्या. यावेळी बहुजन समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष मा. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी प्राध्यापक डी. एन. खरे, जिल्हा उपाध्यक्ष मा. शाह आलमजी, महासचिव मा. राजेंद्रजी करोतिया, ओमप्रकाश जयस्वाल, संदीप जयस्वाल, लालजी यादव, सतीश लोखंडे, दानिश अन्सारी, प्रफुल सोनवणे, सुलतान इद्रिसी, नईम इद्रीसी, असे अनेक कार्यकर्ता यावेळी उपस्थीत होते.

    Post Views:  198


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व