जनसमस्या सोडविण्यात अग्रेसर असलेले विधायक विचाराचे संवेदनशील सामाजिक नेतृत्व : किशोर मानकर
मनुष्य हा समाजशिल प्राणी आहे आणि सुलभ मानवी जीवन जगण्याचे तत्व आत्मसात केल्यानंतर त्याचे महत्व जाणून त्याने समूह जीवनाला प्राधान्य देत आपले आनंदी जीवन जगण्याच्या पद्धतीचा अंगिकार केला. देव, धर्म, पंथ, जाती, पाती आणि अनेक सामाजिक भेदांच्या कलहात आज मनुष्याला मुळ जीवनप्रणालीचा विसर पडून तो समस्यांच्या विळख्यात अडकत चालला आहे. त्याला त्यातून बाहेर काढून निरोगी आणि सचेतन समाजव्यवस्थेच्या निर्मितीकरीता प्रबोधन तथा कृतिशिल सामाजिक उपक्रमांतून सद्विचारांचा प्रसार होणे आज काळाची खरी गरज आहे.
सद्विचारांची वृद्धी म्हणजे खरखुरे समाधानी तथा आनंदी जीवन जीवन जगण्याची कला आत्मसात करून त्याचा उपयोग आपल्या बांधवांकरीताही करून देणे या उद्देशाची परिपूर्ती! ती होण्याकरीताच समाजात अनेक समाजसेवक, प्रबोधनकार विविध उपक्रमात नेहमी सक्रिय राहून आपली ही समाज साधनापार पाडत असतात. अशा व्यक्ती आपल्या विविध वैयक्तिक जीवनप्रवास सांभाळून ह्या बहुमोल जबाबदारऱ्या सांभाळत असतात. अशातलेच एक ध्येयवेडे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मित्र श्री किशोरभाऊ मानकर! प्रथम त्यांच्या जन्मदिनाच्या तथा निरामय आनंदी जीवनासह उदंड आयुष्याकरीता मनःस्वी शुभेच्छा! स्वतः एक कास्तकार, आणि नोकरी सोडली तरीही बि.ई.सिव्हील असल्याने अभियंता म्हणून बांधकाम व्यवसायात अग्रेसर आहेत. गेल्या ३० वर्षापासून अकोला शहरात व्यवसायासोबतच विविध अध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमातून सक्रिय असणाऱ्या किशोरभाऊंचा विधायक विचार आणि सामाजिक कर्तव्याच्या भावनेने नेहमी तत्पर असणारा एक संवेदनशिल सामाजिक कार्यकर्ता हा मुख्य परिचय आहे. समाज जीवनातील मुलभूत समस्यांच्या निराकरणाचा ध्यास असल्याने ते पत्रकारितेमध्येही असून विदर्भ उडाण साप्ताहिकाचे प्रकाशक संपादक असून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अखिल भारतीय स्तरावरील समाजाभिमुख पत्रकार संघटनेचे केंन्द्रीय कोषाध्यक्ष आहेत.
अकोला शहरातील अनेक संस्था, संघटनांसोबत त्यांचे अतिशय सलोख्याचे व सक्रिय सेवाभावातून प्रस्थापित संबंध आहेत. शेती, बांधकाम व्यवसाय उद्योग, व्यापार व शासनाच्या मुलभूत सेवासुविधांच्या मार्गदर्शनाकरीता एक जाणते, चिंतनशिल व्यक्तिमत्व म्हणून ते अनेकांच्या स्मरणात असतात. गेल्या ४ वर्षापासून ते महा. शासनाच्या विद्युत सनियंत्रण समितीवर सदस्य म्हणून कार्यरत असून या माध्यमातून त्यांनी विज मंडळाबाबत नागरिकांच्या उद्भवणारऱ्या असंख्य समस्यांचे प्रभावीपणे निराकरण केलेले आहे.
घरातून मातापित्यांकडूनच सुसंस्कार आणि अध्यात्मिक विचारांचा वारसा लाभलेला त्यांना लाभलेला आहे. त्या प्रेरणेतून त्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या मार्गदर्शनाखाली गायत्री परिवाराच्या धार्मिक व सांस्कृतिक संघटनाद्वारे विचार क्रांती अभियानातून सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला आपली सामाजिक साधना म्हणून स्विकारलेले आहे. विदर्भ विकासातील उणिवांची जाण आणि विकासातील अपेक्षांबद्दल ते चिंतनशिल असून त्याकरीता सर्व राजकीय व्यक्तिंशी पक्ष, जात, पात, धर्म विरहीत विधायक चर्चा करण्यात ते तळमळीने आघाडीवर असतात. असे सर्व क्षेत्रांना स्पर्श करून सद्विचारांच्या पेरणीने युवाशक्ती व ज्येष्ठ कनिष्ठ मंडळीना एकत्र करून संघटीत कार्याकरीता नेहमीच सिद्ध असणारे किशोरभाऊ मानकर म्हणजे सामाजिक प्रवाहातील एक सकारात्मक उर्जाशक्तीचे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांना त्यांच्या आजच्या जन्मदिनी सर्व मित्र परिवार, हितचिंतक आणि पत्रकार सहकार्यांच्या वतीने मनस्वी हार्दिक शुभेच्छा!
संजय एम.देशमुख , निंबेकर
जेष्ठ पत्रकार
Post Views: 220