निंबी येथे श्री रामचंद्र ओंकारेश्वर संस्थान तर्फे काढण्यात आली शोभायात्रा


दोन कार सेवकाचा केला सन्मान
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Feb 2024, 8:35 AM
   

शिंदखेड : शिंदखेड मोरेश्वर येथून जवळच असलेल्या निंबी मालोकार येथील  श्री रामचंद्र ओंकारेश्वर संस्थान च्या वतीने   अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा काढुन दोन कार सेवकाचा सत्कार करण्यात आला. 
 अयोध्या येथे भव्य दिव्य अशा नवीनच बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरामध्ये श्री. रामचंद्र प्रभुजिचींजी प्राणं सुमारे ५०० वर्षांनंतर झाली त्याबद्दल सर्व भारतवासी व महाराष्ट्रात ही प्रती दिवाळी असा आनंदोत्सवच दीपोत्सव साजरा करण्यात आला.याचपर्वावर निंबी मालोकार येथे प्राचीन असे श्रीरामचंद ओंकारेश्वर मंदिर आहे या मंदिराचे अध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळ आणि समस्त गावकरी माता-भगिनी व बंधू व लहान बालमित्रांनी मिळून भव्य शोभा यात्रा काढून प्रती दिवाळी उत्सव साजरा केला तसेच सुमारे ३२ वर्षापूर्वी निंबी मालोकार या गावातील २ कार सेवक बाबरी मस्जिदचा ढाचा पडला तेव्हा त्यामध्ये सहभागी होण्याकरिता अयोध्याला गेले होते. त्यांचे नाव  सोनाजी लीशचंद्र गणेश व वसंत नारायण मालोकार हे गेले होते, म्हणून त्यांचा ही सत्कार या भव्य दिव्य सोहळ्या निमित्त सर्व संस्थांचे अध्यक्ष विश्वस्त आणि गावकरी मंडळी यांच्या तर्फे शाल व श्रीफळ देऊन त्यांना गौरवान्वित करण्यात आले. तसेच मौजे खीरपुरी येथील ह.भ.प. श्री. गजानन महाराज गोंडचवर व त्यांचे सहकारी बालक वर्ग यांनी शोभा यात्रेत सहभाग घेऊन शोभा वाढविली.अयोध्या येथे पार पडलेल्या सोहळ्याचे साक्षीदार झाल्याचा आनंद सर्वांनी अनुभवला व नंतर महाप्रसाद झाले व नंतर कार्यक्रमाची सांगता झाली असे श्री. रामचंद्र ओंकारेश्वर सस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळासाहेब यशवंतराव मालोकार यांनी कळविले.

    Post Views:  202


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व