स्वतंत्रता दिवशी डॉक्टर योगेश साहू यांच्या रतनलाल प्लॉट चौक स्थित सुपर स्पेशलिटी डेंटल केअर सेंटर, येथे मुख कर्करोग निदान व उपचार शिबिराच्या आयोजन लोकसेवा संघ व जीपीए अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. या शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली .शिबिरात ,लोकसेवा संघातर्फे श्रीकृष्ण माळी, विठ्ठलराव गाडे, रवींद्र देशमुख, बाळकृष्ण अडबोल, शिवाजी सोनटक्के ,अनंता पोरे ,देवेंद्र देशमुख , व जीपीए अकोला तर्फे डॉक्टर सुनील बिहाडे, डॉक्टर संदीप चव्हाण, डॉक्टर तुषार माळोकार आदी उपस्थित होते या शिबिरात डॉक्टर योगेश साहू( दंत व मुख शल्य तज्ञ )व डॉक्टर सौ.रेखा साहू ( दंत व मुख शल्य तज्ञ) यांनी रुग्णांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन केले ,या शिबिरात उपस्थित झालेल्या रुग्णांना मोफत तपासणी व पुढच्या उपचारासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले व आवश्यक तपासणी मोफत करण्यात आली . विशेष म्हणजे डॉक्टर योगेश साहू हे आपल्या या दवाखान्यात भारतातला पहिला तंबाखू प्रतिबंधात्मक केंद्र चालवतात व येथे मोफत समुपदेश करून हजारो लोकांची तंबाखू च्या विळख्यातून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांनी कार्य केलेले आहे.
Post Views: 137
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay