विश्वास करंडक बाल नाट्य महोत्सवाचा थाटात शुभारंभ


विश्वास करंडक बाल नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून कलावंत घडविण्याचे मोठे कार्य - शिक्षणाधिकारी सुचेता प
 विश्वप्रभात  11 Dec 2024, 7:01 PM
   

* शुभारंभाच्या दिवशी 6   नाटकाचे सादरीकरण 
अकोला - सांस्कृतिक क्षेत्रातील बाल नाटकाची संकल्पना लोप पावत असतांना विश्वास करंडक बाल नाट्य महोत्सवाचे सातत्याने आयोजन करून मागील 7 वर्षात 200  पेक्षाही जास्त  बाल नाटकें  सादर करणाऱ्या विश्वास करंडक स्पर्धेच्याआयोजक्काची दखल नाट्य क्षेत्राने घेतलीच पाहिजे. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून कलावंत घडविण्याचे मोठे व कौतुकास्पद कार्य घडत आहे. असे प्रतिपादन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर यांनी केले. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉल मध्ये आज पासून सुरु झालेल्या विश्वास करंडक  बाल नाट्य महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. स्पर्धेचे उदघाटन मागील वर्षीच्या स्पर्धेत उत्कृष्ट बाल कला वंताचा पुरस्कार मिळालेल्या आर. डी. जी. पब्लिक स्कुलच्या उत्तरा  पुरकर व येजूवीला पब्लिक स्कुल च्या राघव गाडगे यांचे हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर स्पर्धेचे  निमंत्रक प्रशांत गावंडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, स्पर्धेचे परीक्षक धनंजय देशपांडे, सतीश  माजीरे यांची उपस्थिती होती. 
                     प्रारंभी अतिथीच्या हस्ते रंगदेवता नटराज व जे. आर. डी. टाटा यांच्या प्रतिमाचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. जे. आर. डी. टाटा स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना व स्वागत  गीत सादर केले. जेष्ठ     नाट्य कलावंत प्रा. मधु जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या सदर स्पर्धेत या वर्षी एकूण 30 बाल नाटकें सादर होतं आहेत. स्पर्धेचा शुभारंभ आर. डी. जी. पब्लिक स्कुल अकोलाच्या मला पण बालपण हवय या नाटकाने करण्यात आला. स्पर्धेचे निमंत्रक प्रशांत गावंडे यांनी प्रास्ताविक करून स्पर्धा आयोजनचा हेतु विषद केला. उदघाटक उत्तरा पुरकर, राघव गाडगे तसेच प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
               आज संपन्न झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिशाये स्कुल ऑफ स्कॉलर बिर्ला कॉलनी अकोला, दिव्य दृष्टी जवाहर  नवोदय विद्यालय अकोला, घडलो.. बिघडलो खण्डेलवाल इंग्लिश स्कुल अकोला, योजना बाईचा विकास डॉ मीना बंदे आदर्श इंग्लिश स्कुल वरुड अमरावती व अश्रूची झाली फुले ही नाटकें सादर करण्यात आलीत.
           कार्यक्रमास अशोक ढेरे, सुनील गजरे, विष्णुपंत निंबाळकर, अरुण घाटोळ, मोहन खडसे, अविनाश पाटील, बबनराव  कानकीराड, अनिल कुलकर्णी, ममता इगोले, प्रदीप अवचार, प्राचार्य प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे, रितेश महल्ले, अंकुश इंगळे, सचिन गिरिया, रावसाहेब काळे, यांचे सह बाल कलावंत व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन ओजस्विनी पांडे यांनी केले 

    Post Views:  78


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व