मायलेकाची हत्या सुनियोजीत, मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
09 May 2024, 1:27 PM
संग्रामपूर : अमरावती येथील मंगलधाम कॉलनीमध्ये कुंदा देशमुख व सुरज देशमुख या मायलेकाची हत्या ही सुनियोजित असून यामधील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देशमुख मराठा संग्रामपूर यांनी केली. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली.
या निवेदनात सांगितले की, 29 एप्रिल रोजी मंगलधाम कॉलनी परिसरातील बालाजी नगर येथे मायलेकाची झालेली ही हत्या कोपरडी हत्याकांडातील घटनेची पुनरावृत्ती आहे, हे अत्यंत क्रूर आणि सुनियोजीत हत्याकांडातील आरोपींवर व
त्यांच्या सहकाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी संग्रामपूर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
Post Views: 100