मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्था संचालकांचे सहकार प्रशिक्षण
अकोला-- पारदर्शक व्यवहार आणि शिस्तबध्द वाटचालीने सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरून सहकारात आपली नवी ओळख निर्माण करणाऱ्या मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांचा सहकार प्रशिक्षण वर्ग नुकताच हॉटेल सेन्ट्रल प्लाझा येथे संपन्न झाला.
संस्था अध्यक्ष संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काकासाहेब दिक्षित सहकार प्रशिक्षण केंन्द्राकडून घेण्यात आलेल्या सहकार विषयातील या शिबीरात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕंकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक श्री.एस.आर. बोडखे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.त्यांनी सहकारातील विकासाला बाधक ठरणाऱ्या कर्ज थकीत विषयापासून सुरूवात करून कर्जदार थकीत होण्याच्या कारणांसह,कर्जप्रकरणातील कायदेशीर कागदपत्र आणि प्रत्यक्ष वितरण व कर्जवसूली प्रकरणातील बारकांव्यांसंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षिय भाषणातून संजय देशमुख यांनी दिवंगत संस्था अध्यक्ष स्व.स्वामी शांतानंद सरस्वती यांना अभिवादन करून सर्व संचालकांसह कर्तव्यपालन करून नि:पक्ष आणि निष्ठेच्या प्रयत्नांनी मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेला विकासाची नवी दिशा देण्याची ग्वाही यावेळी दिली.
याप्रसंगी सर्वप्रथम संस्थेचे नुकतेच दिवंगत झालेले सभासद स्व.निळकंठराव देशमुख व संचालिका सौ.शोभाताई तेलगोटे यांचे वडील स्व.बाजीराव दामोदर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या मार्गदर्शन शिबीरात सर्व संचालक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे संचलन भास्कर काळे यांनी तर आभारप्रदर्शन माणिकराव सरदार यांनी केले.
Post Views: 330