निर्माण मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटीची निवडणूक अविरोध


 संजय देशमुख  2022-06-05
   

अकोला:- सहकार व विविध क्षेत्रात अनेक उपक्रमांनी गेल्या १० वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या व सलग सात वर्ष बॅंको पुरस्कार प्राप्त करणाऱ्या निर्माण मल्टीस्टेट को. ऑप.क्रेडिट सोसायटीची निवडणूक नुकतीच अविरोध पार पडली.यामध्ये सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी नवे संचालकांचे नवे कार्यमंडळ विराजमान झाले आहे.
                 निवडणूक निर्णय अधिकारी श्री विनायकजी कहाळेकर ,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,अकोला यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री विजयकुमार चवरे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. या निवडणूकीमध्ये सर्वश्री गणेशराव देशमुख, अध्यक्ष,के.जी देशमुख,उपाध्यक्ष,तर संचालक म्हणून संतोष देशमुख,प्रभाकर सोळंके,रामचंद्र गवळी,अरूण चव्हाण,कृष्णराव वि. देशमुख,डोंगरगावकर,विठ्ठलराव देशमुख,वसंतराव काळे,शिवाजी काळे, देवीदास वाघमारे,कविता ताई ढोरे, सुनिता ताई गावंडे,आशाताई थोरात,यांची अविरोध निवड करण्यात आली‌.या निवडणूकीसाठी मुख्य सरव्यवस्थापक गजानन खोटरे,कर्ज विभाग व्यवस्थापक नितीन डोमकुलवार,आशिष टाले यांनी सहकार्य केले.

    Post Views:  266


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व