डॉ. जयपाल पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
11 Mar 2024, 9:06 AM
अलिबाग : अलिबाग येथील प्रसिद्ध समाजसेवक, आदिवासी सेवक, प्राणी मित्र, कृषी मित्र आणि जागतिक पातळीवर पोहोचलेले आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, डॉ. जयपाल पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने राज्यस्तरीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण (दलित मित्र) पुरस्कार सन 2019 20 चा जाहीर केला आहे.मागील 25 वर्षापासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागासवर्गीय जाती. शारीरिक दृष्ट्या अपंग, कुष्टरोगी साठी,समाज कल्याणा साठी त्यांनी मौलिक कार्य करून अविरत समाजसेवा व त्यांच्या उत्कर्षासाठी झटणारे डॉ. जयपाल पाटील हे अलिबाग तालुक्यातील हा पुरस्कार प्राप्त करणारे आगरी समाजातील समाजसेवक आहेत.आर.सी.एफ.थळ कारखान्यात कार्यरत असताना त्यांना पहिला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने गुणवंत कामगार पुरस्कार सन 1993 साली प्राप्त झाला. महाराष्ट्र शासनाच्या वनखात्यातर्फे छायाचित्रण स्पर्धेत राज्यस्तरीय तिसरा क्रमांक प्राप्त झाला होता. दैनिक सागर मध्ये असताना महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात जिल्ह्यात उत्कृष्ट पत्रकारितेचे तिसरा क्रमांक प्राप्त झाला होता, ते अलिबाग तालुक्यातील असा पुरस्कार प्राप्त करणारे पहिलेच पत्रकार होते. रगडात आदिवासी समाजाच्या विकासासाठी सेवा केल्याने महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी कल्याण विभागाने सन 2019 चा आदिवासी सेवक पुरस्कार देऊन गौरव केला होता.अलिबागेत हा पुरस्कार मिळवणारे पहिले होत.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार2019प्र.क्रमांक.100 मा. राज्यपालांच्या आदेशाने श्री रविंद्र गोरवे उपसचिव यांनी कळविले असून सन 2019-20 पुरस्कारासाठी निवड होऊन मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी मुंबई येथे हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्ह्याचे समाज कल्याण आयुक्त श्री.सुनील जाधव यांनी फोन द्वारे देऊन माझे अभिनंदन केले.
Post Views: 174