सौ.शांतादेवी डी.पाटील यांच्या जन्मदिनी ग्रुपमधील १३६ विद्यार्थ्यांना १ कोटी ५१ लाखांची सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप
Sanjay Deshmukh
2024-01-18
कोल्हापूर--डी. वाय.पाटील ग्रुपच्या डॉ .संजय डी.पाटील व माजी गृहराज्यमंत्री व विद्यमान आमदार सतेज डी.पाटील यांच्या मातोश्री सौ. शांतादेवी डी. पाटील दि.१७ जानेवारीला जन्मदिन अभिष्टचिंतन समारंभ संपन्न झाला.या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापुरातील डी.वाय.पाटील शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप अवॉर्ड कार्यक्रम दि.१७ जानेवारी रोजी संपन्न झाला. शिवाजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या उपक्रमाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.
कोल्हापुरातील डी. वाय. पाटील समूहाच्या शिक्षण संस्थांमधील प्रत्येक शाखेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला ही मेरिट स्कॉलरशिप देण्यात आली. यावर्षी१३६ विद्यार्थी या मेरिट स्कॉलरशिप अवॉर्डचे मानकरी ठरले.१ कोटी ५१ लाख रुपयांच्या या स्कॉलरशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मागील शैक्षणिक वर्षातील फी माफ करण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले की, डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांनी घालून दिलेल्या दातृत्वाचा वारसा त्यांचे कुटुंबीय समर्थपणे पुढे चालवत आहेत. आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा समारंभ महाराष्ट्रासाठी आदर्शवत असून हा फक्त समारंभ नसून मूल्यनिष्ठ कुटूंब व्यवस्था समजून घेऊन जपण्याचा आणि हा विचार इतरांपर्यंत पोहचवण्याचा समारंभ आहे .याप्रसंगी व्यासपीठावर माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील व सौ.सौ.शांतादेवी डी.पाटील प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सौ. शांतादेवी पाटील यांनी कुटुंबातील सदस्यांना सामाजिक मूल्यांचे अधिष्ठान दिले. डी. वाय. पाटील कुटुंबातील सर्वच सदस्यांनी उत्तुंग यश मिळवून सुद्धा त्यांच्या मध्ये असलेली नम्रता ही आई वडिलांच्या संस्कारातून आली असल्याचे मत लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
आमच्या शिक्षणासाठी आईने घेतलेल्या निर्णयामुळे आयुष्याला आकार मिळाल्याची भावना यावेळी बोलताना डॉ. संजय डी. पाटील साहेब यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ.सजय डी.पाटील यांनी आपल्या मनोगतातून आम्हा सर्व बहीण-भावांच्या यशस्वी वाटचालीत आईंचा फार मोठा वाटा असून आईच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि डॉ. डी .वाय. पाटील साहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही सर्व भावंडे आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरलो आहोत. स्कॉलरशिपप्राप्त विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून भविष्यात एकतरी विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घ्यावा, असे आवाहन केले.
स्कॉलरशिपप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व उज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला सौ. राजश्री काकडे, मेघराज काकडे, सौ. वैजयंती संजय पाटील वहिनी, देवराज पाटील, अजितराव पाटील (बेनाडीकर) ,आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, भरत पाटील ,करण काकडे, सौ.पूजा पाटील, सौ. वृषाली पाटील, चैत्राली काकडे तसेच कोल्हापूर लोकमतचे संपादक डॉ. वसंत भोसले, तरुण भारतचे संपादक मनोज साळुंखे, पुण्यनगरीचे संपादक राजकुमार चौगले, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, सीएचआरओ श्रीलेखा साठम यांच्यासह आमच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक तसेच सर्व संस्थांचे प्राचार्य, स्कॉलरशिपप्राप्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
Post Views: 248