अकोला: प्रभात किड्स स्कूलची इयत्ता चवथ्या वर्गातील बाल गानकोकिळा परिनीता प्रशांत बारापत्रे हीने अकोला आयडॉल- २०२२मध्ये गानकौशल्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले असून तीने अ गटातून द्वितीय पुरस्कार प्राप्त केला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून युवा विचारपीठ कला संस्कृती संघ, अकोला द्वारे अकोला आयडॉल राज्यस्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी आयएमए सभागृहात करण्यात आले होते. दिवंगत ह.भ.प. वासुदेव भोंडे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या स्पर्धेत परिनीता हीने गझल सादर केली आणि स्पर्धेत अ गटातून द्वितीय पुरस्कार प्राप्त केला.
यापूर्वी परिनीता हीने विविध आंतरशालेय स्पर्धातून पुरस्कार प्राप्त केले असून तिने गायलेले गीत युट्यूबवर देखील प्रसिद्ध झाले आहेत. परिनीता हीला तिचे वडील प्रशांत बारापात्रे, आई रुपाली बारापात्रे व धनंजय देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले.
प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. असिफ, सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांच्यासह संगीत विभागाने परिनीताचे कौतुक केले आहे.
Post Views: 196
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay