नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर पुणे येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले. नेताजी सुभाष चंद्र बोस ट्रस्ट यांच्या माध्यमातून नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले योगदान व बलिदान यांचे प्रशालेतील विद्यार्थ्यांना स्मरण व्हावे. तसेच त्यांना प्रेरणादायी कार्याची अधिक माहिती मिळावी या उद्देशाने मोबाईल व्हॅनद्वारे प्रशालेच्या प्रांगणात चित्रफीती व चित्र प्रदर्शन विद्यार्थिनींना दाखविण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार व राज्यसभा सदस्य डॉ.विनय सहस्त्रबुद्धे, संस्थेचे उपसचिव प्रदीपजी वाजे, व्यवस्थापक मंडळ सदस्य श्री.अभय कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शोभा कांबळे, उपमुख्याध्यापक श्री.विष्णू मोरे, पर्यवेक्षक श्री. संजय रायपूरकर, श्री. प्रसाद नगरकर, सौ.सुचिता पवार, प्रशालेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.
Post Views: 218