एल.आर.टी. कॉलेजच्या एन.सी.सी. कॅडेट् यांना तिरंगा वाटप


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  12 Aug 2022, 6:38 PM
   

दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या एन. सी. सी.  कॅडेट्स साठी आज़ादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत तिरंगा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन सर्व देश वासीयांनी मोठ्या उत्साहात साजरा करून घरोघरी तिरंगा फडकावा आणि त्यांच्यात राष्ट्रीय भावना जागृत व्हावी.
११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी व लेफ्टनंट कर्नल चंद्रप्रकाश भदोला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीमती. एल. आर. टी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके व महाविद्यालयाचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. जी. चापके कॅडेट्सला तिरंगा देऊन मार्गदर्शन करतांना म्हणाले कि,भारताचा राष्ट्रध्वज हा देशाचा गौरव आणि अभिमान आहे. त्याची रचना महापुरुषांनी अतिशय काळजीपूर्वक केली आहे. ज्यामध्ये प्रत्येक रंग आणि वर्तुळ देशाची एकता, अखंडता, विकास आणि समृद्धी दर्शवते, म्हणूनच आपण त्या तिरंग्याचा आदर केला पाहिजे. एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी कॅडेट्सला याचे महत्त्व सांगताना म्हणाले की, राष्ट्रध्वज हा भारताचा अभिमान आहे. राष्ट्रध्वजाचा वापर कसा करायचा, कसा करू नये या सर्व सूचनांचे आपण सर्वांनी गांभीर्याने पालन केले पाहिजे आणि आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होऊन, तुम्हाला तुमच्या घरी तिरंगा लावायचा आहे असे आव्हान त्यांनी कॅडेट ला केले. या कार्यक्रमाला दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्र जैन, मानद सचिव श्री. पवन माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजित परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी कॅडेट्सचा आत्मविश्वास वाढविला. या कार्यक्रमासाठी कॉर्पोरल जयश्री हरसुलकर, लान्स कॉर्पोरल प्राची सदांशिव, कॅडेट मिनल रेड्डी, कॅडेट प्राजक्ता नारखेडे, कॅडेट रेशमा गालफाडे, कॅडेट ईश्वरी वानखडे, कॅडेट वैष्णवी पांडे, कॅडेट साक्षी ठाकरे, कॉर्पोरल श्याम ढोरे, लान्स कॉर्पोरल शिवम देशमुख, कॅडेट सुरज सरकटे, कॅडेट नागेश कचरे‌, कॅडेट रितिक आगरकर, कॅडेट ॠषिकेश शेलार, कॅडेट प्रथमेश तळेकार, कॅडेट हेमंत रसाल, कॅडेट अभय पारधी, कॅडेट साहिल बहाड, कॅडेट ओम डांगे, कॅडेट तेजस डांगे, कॅडेट साक्षी पांडे, कॅडेट अवंतिका खंडार, कॅडेट वैष्णवी ढेंमरे, कॅडेट सलोनी यादव, कॅडेट नैना टोंगऴे, कॅडेट तनाया नाफाडे, कॅडेट स्नेहल गायकवाड़, कॅडेट किरण माने, कॅडेट गीता गावंडे, कॅडेट मयूरी बर्दिया, कॅडेट पुर्वा देवघरे, कॅडेट अनिकेत शिरसागर, कॅडेट श्रीकांत वाडोकार, कॅडेट जय नांदोडे, कॅडेट हेमंत पिंपळे, कॅडेट धनंजय लाटे, कॅडेट रोहन साबे, कॅडेट महेश मोफलकार, कॅडेट प्रणव वानखडे, कॅडेट वैभव कांबळे, कॅडेट रोशन इंगोले, कॅडेट प्रणव इंगोले, कॅडेट हर्षल पाल, कॅडेट सागर वानखडे, कॅडेट कार्तिक लाडगे, कॅडेट चेतन जगताप, कॅडेट धर्मराज राऊत, कॅडेट अरविंद कुमार यादव, कॅडेट सर्वेश धांडे हे सर्व कॅडेट्स  सहभागी होते.

    Post Views:  240


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व