आदर्श गावच्या महिलेचा घरासाठी टाहो... घर द्या हो आम्हाला घर द्या


कापशी रोड येथील वृध्द महिलेची विनवणी
 विश्वप्रभात  24 Apr 2024, 4:47 PM
   

कापशी : अकोला तालुक्यातील आदर्श गाव कापशी  रोड येथील रहिवासी बसंताबाई बाबुलाल केवट यांनी सांगितले की आमच्या दोन पिढ्या होऊन गेल्या तरी आम्हाला घरकुलचा किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या महिलेने विनवणी केली की आम्हाला घर द्या. घरात अठराविश्व दारिद्रय पती ला अपंगत्व आल्याने गेल्या दहा वर्षांपासून जाग्यावरच  पडून आहेत. राहायला घर नाही  अशा परिस्थितीत ग्रामपंचायत प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी काही  मदत करणे गरजेचे असतांना आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. तरी शासनाने लक्ष देवून घरकूल मिळवून  देण्याची मागणी  बसंताबाई बाबुलाल केवट यांनी केली आहे.

    Post Views:  254


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व