देशमुख समाजातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा दि. १६ जुलै रोजी सत्कार समारंभ
गुणपत्रिका व माहिती पाठविण्याचे आवाहन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2023-07-04
अकोला- शैक्षणिक पात्रतेचे उंबरठे ओलांडत भावी आयुष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या समाजातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक होणे क्रमप्राप्त असते.
अशा विद्यार्थ्यांना आयुष्याच्या वाटचालीत पुढे जातांना सकारात्मक प्रोत्साहनाचे बळ प्राप्त व्हावे म्हणून देशमुख समाजातील १० वी व १२ मधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थांच्या या सन्मान समारंभाचे आयोजन दि.१६ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता जि.प.कर्मचारी भवन,पोलीस स्टेशनच्या बाजूला,सिव्हील लाईन्स अकोला येथे करण्यात आले आहे.
अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळ,देशमुख महिला मंडळ व देशमुख समाज जागृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यातील देशमुख समाजातील १० वी आणि १२ वी मध्ये ८० टक्के आणि त्यापुढील गुणानुक्रमाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी त्याचप्रमाणे NEET,MPSC व UPSC मध्ये पात्र ठरलेल्या गुणवंतांचा सन्मान म्हणून कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.तरी देशमुख समाजातील पालकांनी आपल्या पाल्ल्यांच्या नावांची या पूर्वनोंदणी करण्यासाठी त्यांची गुणपत्रिका,एक पासपोर्ट फोटो व मोबाईल नंबर आणि संपूर्ण पत्त्यासह आपली माहिती
१) सौ.राजश्रीताई देशमुख, हॉटेल सेन्टर प्लाझा, केडीया प्लॉट, अकोला (मोबा.क्र.९९२१३२८९२०)
२) श्रीमती कविताताई ढोरे, ई- बर्ड इंटरनेट कॅफे ,गजानन महाराज मंदिराजवळ, सहकार नगर, अकोला
(मोबा.क्र.९८२२८०४५०५)
३) हरिष देशमुख, छाया मेडीकल, छाया हॉस्पिटल, डाबकी रोड, अकोला (मोबा.क्र९८२२५१७५३३)
४)श्री.के.व्ही.देशमुख, कृष्णशोभा, अंबिका नगर, डाबकी रोड, अकोला. (मोबा.क्र.९४२२८८२७७७)
५)शेखर देशमुख, तनिष्का डेअरी, माधवनगर,गोरक्षण रोड अकोला. मोबा क्र.९६२३००४७३७
६) ज्ञानेश्वर देशमुख ज्ञानेश्वर किराणा अँड जनरल स्टोअर्स, दुर्गा माता मंदिराजवळ, शरद नगर, शिवर, अकोला, मोबा क्र.७७९६४९७४९८
७)चंडिका ऑटो सेन्टर, आसोलकर मार्केट, मेन रोड,मोठी उमरी, अकोला. मोबा क्र.९४२१७४९३५५
याठिकाणी समक्ष किंवा पोस्टाद्वारे रविवार दि.10 जुलै २०२३ पर्यंत पाठवावी.यासाठी दि.८ जूलै नंतर आलेली माहिती,तसेच व्हाटस् पवरून पाठविलेली माहिती स्वीकारली जाणार नाही. पूर्वनोंदणी करणेच आवश्यक राहील.वेळेवर येणाऱ्या कोणालाही या सत्कार समारंभात सहभागी करता येणार नाही. या शिस्तीचे पालन सर्वांना बंधनकारक राहील. तरी देशमुख समाजाकडून आयोजित या कौतुक सोहळ्यात जास्तीत जास्त समाजबांधवांनी आपल्या गुणवत्ताप्राप्त मुला मुलींना सहभागी करावे असे आवाहन अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळ अध्यक्ष संजय एम.देशमुख, निंबेकर,उपाध्यक्ष के.व्ही देशमुख, डोंगरगावकर, सौ.कल्पनाताई देशमुख सचिव अश्विन देशमुख, महिला मंडळ अध्यक्षा सौ.राजश्री देशमुख, जागृती मंडळ अध्यक्ष संजय देशमुख कंझारेकर सचिव नितीन देशमुख व तिनही मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Post Views: 249