इंजिनीयर संदीप पाटील महल्ले यांना इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे प्रमाणपत्र
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
12 Mar 2026, 8:31 AM
प्रत्येक मनुष्याचे स्वप्न असतं की त्याचं सुंदर व टिकाऊ घर असावे. घर बनवताना पर्यावरण पूरक सामग्रीचा वापर करण्यात येतो का, त्यासोबतच घरातील वातावरण प्रसन्न व शाश्वत असावे. यासंदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वतीने नुकताच ग्रीन बिल्डिंग प्रोडक्ट्स व ग्रीन बिल्डिंग इमारत बांधकाम विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्थापत्य अभियंतांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अल्ट्राटेक कंपनीचे शिरीष ढगे व प्रकाश काळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये वास्तूशोभा कन्स्ट्रक्शन चे इंजिनीयर संदीप पाटील महल्ले, यांच्या प्रोजेक्ट ला इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिलच्या वतीने गोल्ड सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. अतिशय मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार अकोल्या मधून संदीप पाटील यांना मिळाला आहे.
संदीप पाटील महल्ले यांनी ग्रीन हाऊस निर्मीतीवर भर देऊन, बांधकाम करतांना निसर्गाचा समतोल कसा राखता येईल, जास्तीत जास्त नैसर्गिक संसाधनांचा वापर करुन, सौरऊर्जा तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग यावर भर देत, बांधकाम करणारी कंपनी म्हणून संदीप पाटील यांच्या कंपनीकडे बघितलं जातं. या कार्यक्रमाला अकोला येथील स्थापत्य अभियंतांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच वास्तूशोभा कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने संचालक जयदीप महल्ले व निशिकांत बडगे हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.
Post Views: 8