लोकशाहिर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जयंती नांदेड आणि तेलंगणात साजरी
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
03 Sep 2024, 11:25 AM
(कॉम्रेड ईश्वर तलवारे नांदेड जिल्हा प्रतिनिधी)
देगलूर-- मातंग समाजाच्या विकासासाठी आयुष्यभर मोलाचं योगदान देणारे, शाहिरीतील समाजप्रबोधनातून समाजागृतीचं व्यापक कार्य करणारे, मातंग समाजाचे आधारस्तंभ लोकशाहिर कॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती नांदेड जिल्ह्यातील गावागावात आणि तेलंगणामध्ये सुध्दा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अॕड.एन.जी सुर्यवंशी व नांदेड जिल्हा अध्यक्ष,कॉम्रेड ईश्वर तलवारे,मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा अध्यक्ष मश्चिंद्र गवारे व मातंग समाजाचे मराठवाडा अध्यक्ष सुभाष अल्लापूरकर दादा यांनी दि.१ ते ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महिनाभरात लोकशाहिर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे समारंभ नांदेड जिल्ह्यातील व तेलंगणातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात घडवून आणले.
या कार्यक्रमांना सकल मातंग समाज बांधवांनी जोरात प्रतिसाद दिला.देगलूर,लोणी, लख्खा, तुबरफळी,हाजगुळ तेलंगणा, मदनूर, अवळगाव, लिंगनकेरूर,बल्लूर, माळेगांव,वळग, चोंडी, तमलूर,भक्तापूर,हाणेगाव, कोकलगाव या सर्व गावांमध्ये अतिशय शांततेत मिरवणूका आणि कार्यक्रम संपन्न झाले. ड.सुर्यवंशी यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या संदेशाचे आणि आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन केले.त्याचप्रमाणे उपस्थित समाजबांधवांना त्यांच्या हक्कांची,शासकीय योजनांची माहिती देऊन आणि कायदेविषयक मार्गदर्शन केले.यावेळी इतर वक्त्यांनी सुध्दा अण्णाभाऊ यांनी समाजासाठी केलेल्या त्यागाची माहिती दिली.तसेच समाजात चेतना निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रबोधन आणि सामाजिक कार्याची तथा सामाजिक उत्थानासाठी दिलेल्या संघर्षक लढ्याची जाणीव समाजबांधवांना याप्रसंगी दिली. एका महिन्याचा वेळ या जयंती समारोहासाठी काढून महिनाभराच्या पर्वात गावागावात घडविलेले कार्यक्रम स्थानिक समाजबांधव आणि युवा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मिरवणुका,घोषणांच्या निनादात व मार्गदर्शनाच्या कार्यक्रमांनी भरगच्च प्रमाणात यशस्वीपणे पार पडले.
Post Views: 114