पाणीपुरवठा ठप्प झालेल्या विविध भागांना अन्य मार्गाने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करताना खबरदारी तसेच नियोजन न केल्याने आता शहरातील पाच जलकुंभाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या प्रकारामुळे आता पाणीटंचाईचा फटका जवळपास संपूर्ण शहराला बसला आहे.
25 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केद्रातून 600 मिली मिटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे शहरातील 8 जलकुंभाना पाणी पुरवठा होतो. जलवाहिनी फुटल्याने 8 जलकुंभाचा पाणी पुरवठा ठप्प झाला. जलवाहिनी दुरुस्तीला लागणारा वेळ लक्षात घेवून तसेच नागरिकांची सुरू झालेली ओरड पाहून पाणीपुरवठा विभागाने ज्या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला, त्या भागाला अन्य जलकुंभातून तसेच बायपास पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला. हा पुरवठा करताना अन्य भागाचा पाणीपुरवठा केवळ एक दिवसाने पुढे जाईल, याबाबतची खबरदारी घेणे आवश्यक होती. जोगळेकर प्लॉट भागातील जलवाहिनीवरुन शिवनगर भागातील जलकुंभावरील 80 टक्के भागाला पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे अन्य भागाचा पाणीपुरवठा केवळ एक दिवसाने पुढे ढकलला. मात्र नविन बसस्थानका मागील जलकुंभातून ज्या भागाला पाणी पुरवठा होतो, त्या भागाला पाणी पुरवठा करताना दक्षता न घेतल्याने पाच जलकुंभाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे आता संपूर्ण शहराचाच पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
नियोजनाचा अभाव
नविन बसस्थानकावरील जलकुंभातून ज्या भागाला पाणी पुरवठा होतो, त्या भागाला थेट बायपासने पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र पाणी पुरवठा किती तास ठेवावा? याबाबत नियोजन आखले नाही. या नियोजनाचा फटका अन्य भागाला बसला.
पुरवठा झाला विस्कळीत
जलकुंभ --- क्षमता -- लोकसंख्या
महाजनी - 2 - 35 लाख लिटर - 43 हजार
आदर्श कॉलनी- 2 - 35 लाख लिटर - 56 हजार
केशव नगर- 1 - 17.50 लाख लिटर - 18 हजार
जलवाहिनी पुन्हा न फुटण्यासाठी लावणार एअर व्हॉल्व
अशोक वाटिका चौकातील भारतरत्न अटलबिहारी उड्डाण पूलाच्या लॅडींग खाली फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीचे काम अद्यापही सुरु आहे. जलवाहिनी पुन्हा फुटू नये, यासाठी खबरदारी म्हणून जलवाहिनीवर एअर व्हॉल्व बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील 25 एमएलडी क्षमतेच्या केंद्रातून शहराला 600 मिली मिटर व्यासाच्या जलवाहिनीने पाणीपुरवठा होतो. ही जलवाहिनी 1977 साली अंथरण्यात आली आहे. त्यामुळे जलवाहिनी जिर्ण होत चालली आहे. त्यामुळे अधिक दाब आल्यास जलवाहिनी फुटते. 19 डिसेंबर रोजी उड्डाणपूलाच्या लॅडींग खाली जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहरातील आठ जलकुंभाचा पाणीपुरवठा ठप्प झाला. लॅडींग खाली फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करता येत नसल्याने लॅडींग पासून जलवाहिनी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रस्ता खोदून जलवाहिनी वळविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र विविध तांत्रिक कारणामुळे हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. दरम्यान जलवाहिनी अंथरण्याचे काम सोमवारी रात्री उशिरा पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. अंथरण्याचे काम पूर्ण झाल्या नंतर जलवाहिनी पुन्हा फुटू नये, यासाठी एअर व्हॉल्व बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Post Views: 127
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay