समाजहित अभियान प्रतिष्ठान व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान
समाजाची बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते तथा कलावंत बालाजी दामूके यांनी केले रक्तदान
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Dec 2024, 11:34 AM
परभणी (वार्ताहर युनूस कच्ची / शेख कलीम) शहरातील समाजासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संघटना समाजहित अभियान प्रतिष्ठान व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा शाखा परभणी च्या वतीने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णाला रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिले आहे. अधिक माहिती अशी की, दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णाला B+ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रक्ताचे अत्यंत आवश्यकता होती, तेव्हा रुग्णाच्या नातेवाईक यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्याशी संपर्क करून रक्त उपलब्ध करून देण्यास विनंती केली. तेव्हा प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी सामाजिक कार्यात सदैव पुढे असणारे कलावंत बालाजी दामूके यांना संपर्क साधून रक्तदान करण्यास विनंती केली . तेव्हा बालाजी दामूके यांनी थोडाही विचार न करता रक्तदान करण्यासाठी ते तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून त्या गरजू महिलेले रक्त उपलब्ध करून देऊन मदत केली आहे. रक्तदान केल्यामुळे रक्तदाते बालाजी दामूके यांचा समाजहित अभियान प्रतिष्ठान, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, मेट्रो ब्लड बँक च्या वतीने त्यांना पुष्पहार घालून सत्कार करून आभार मानले आहे. यावेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा संपादक समाजहित न्यूज प्रमोद अशोकराव अंभोरे, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, समाजहित न्यूजचे व्यवस्थापक प्रतिनिधी संदीप वायवळ, समाजहित न्यूजचे वार्ताहर पत्रकार युनूस कच्ची बोगानी, वार्ताहर पत्रकार शेख कलीम, मेट्रो ब्लड बँक कर्मचारी विठ्ठल शिंदे, अनिल सावंत, माधव गोचडे, आत्माराम जटाळे, सचिन पवार, विजय नंद आदींच्या वतीने रक्तदाते बालाजी दामूके यांचा पुष्पहार घालून सत्कार करून आभार मानले आहे. त्याचबरोबर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन तमाम जनतेला समाजहित अभियान प्रतिष्ठान व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघच्या वतीने रक्तदान करण्याचे आव्हान केले आहे.
Post Views: 37