जिल्हा गुंतवणूक परिषदेत साडेसातशे कोटींचे करार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Mar 2024, 8:16 AM
   

अकोला : उद्योग विभागातर्फे हॉटेल आरजी एक्सक्ल्यूसिव्ह येथे आज भरविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत विविध गुंतवणूकदार व महाराष्ट्र शासन यांच्यात 750 कोटी रु. रकमेचे सामंजस्य करार करण्यात आले.
मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी श्री. औटी व एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. पारधी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांच्या उपस्थितीत  परिषदेचा शुभारंभ झाला.  जिल्ह्यातील उद्योग, वैद्यकीय, शेतकरी उत्पादक कंपनी आदी क्षेत्रातील 50 गुंतवणूकदार व शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले.
गुंतवणुकीला प्रोत्साहन, औद्योगिक सुविधा, व्यवसाय सुलभीकरण व उद्योगासाठी आवश्यक परवानग्या, मंजुरी आणि कालमर्यादेत सेवा देण्याच्या दृष्टीने उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा,मैत्री कक्ष, कायद्याविषयीचे मार्गदर्शन यावेळी विविध विभागप्रमुखांनी केले. गुंतवणूकदार व व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा परिषदेचा उद्देश होता. परिषदेला सनदी लेखापाल विविध विभागांचे अधिकारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Post Views:  237


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व