कुरणखेड येथे लोकस्वातंत्र्यकडून दि.२२ रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
स्व.डॅडी देशमुख यांचे स्मरणार्थ आयोजन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Dec 2023, 9:56 AM
अकोला - विविध आरोग्य तपासण्या व स्वास्थ मार्गदर्शन शिबीरांच्या कार्यक्रमातून आरोग्य क्षेत्रात कृतिशील कार्य करणारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना व सोबत कुरणखेड येथील सार्वजनिक विवेकानंद वाचनालयाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांसाठी मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे श्री.गजानन महाराज विद्यालय कुरणखेड ता.जि.अकोला येथे शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आलेले आहे.
शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील सेवाव्रती स्व.डॅडी देशमुख यांचे स्मरणार्थ आयोजित या शिबीराच्या नियोजनात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पदाधिकारी व वाचनालयाचे अध्यक्ष श्री मनोज देशमुख यांनी पुढाकार घेतलेला आहे. दम्माणी नेत्र रूग्णालय अकोला व रोटरी क्लब बॉम्बे हॅंगींग गार्डन, मुंबई यांच्या सौजन्याने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रभात किडस् स्कूलचे संचालक डॉ.गजाननजी नारे तर प्रमुख अतिथी म्हणून दम्माणी नेत्र रूग्णालयाचे संचालक व मुख्य व्यवस्थापक सभापती शुक्ल,अकोला ग्रंथालय अधिकारी राजेशजी कोलते,उद्योजक प्रशांतजी देशमुख,पं.स.समिती सदस्या सौ.सुषमा ठाकरे,कुरणखेड सरपंचा सौ.प्रगती पांडे, पोलिस निरीक्षक मनोज केदारे, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी सहा.पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम ठाकरे,अमरावती विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शामराव वाहुरवाघ,जिल्हा ग्रंथालयाचे कैलास गव्हाळे,गजानन महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक रणजित सोळंके यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या शिबीरामध्ये दम्माणी नेत्र रूग्णालयाचे मुख्य शल्य चिकित्सक डॉ.मनिषजी हर्षे, डॉ.दत्ता पवार, डॉ.दिपीका तेलगोटे हे रूग्णांची तपासणी करून शस्तक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या रूग्णांवर दम्माणी रूग्णालयात दिलेल्या तारखांना शस्त्रक्रिया करतील.
यासाठी नोंदणी फी रू.५० राहणार असून शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रूग्णांना रक्त ,लघवी तपासणी व भूलीकरणासाठी रू.३०० शिबीर स्थळावरच भरावे लागणार आहेत. शिबिरात जवळचा नंबर असणाऱ्या गरजू रूग्णांना १०० रूपया मध्ये चष्मे वितरीत करण्यात येणार असून सत्य साई सेवा समितीव्दारे विनामुल्य औषधे देण्यात येणार आहेत.या शिबीरासाठी गजानन महाराज विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी व मॉ चंडिका आपात्कालीन बचाव पथक,ग्रीन बॉईज ग्रूप तथा कुरणखेड ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा कुरणखेड परिसरातील रूग्णांनी जास्ती जास्त लाभ घ्यावा असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ,अकोला व सार्वजनिक विवेकानंद वाचनालय कुरणखेड यांनी केले आहे.
Post Views: 212