अकोला : शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे. त्यापैकी तिघे दिल्ली येथे तर एक पुणे येथे पोहोचले असून उर्वरित एक जण हे विदेशात मात्र भारतीय दुतावासात सुरक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कळविलेल्या माहितीनुसार, मोहित विजय मालेकर, हुसेनउल्ला खान व अब्दुस साबुर अहमद हे विद्यार्थी दिल्ली येथे पोहचले आहे. तर जॅक निक्सन हे पुणे येथे मामाच्या घरी पोहचला आहेत. उर्वरित प्राप्ती भालेराव ही विद्यार्थिनी युक्रेनची सीमा पार करुन स्लोहोकिया मध्ये सुरक्षित ठिकाणी असून भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. या उर्वरित विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरु आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Post Views: 154
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay