शेतात गांज्याची लागवड, आरोपीस अटक; ३० हजाराचा मुद्देमाल जप्त


विशेष पथकाची कारवाई
 Pankaj Deshmukh  2021-11-24
   

अकोला :  जिल्ह्यातील धारूर शाहनूर परिसरात मादक अमली पदार्थ गांजाची शेतात झाडे लावणाऱ्या आरोपीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई केली. या कारवाईत गांजाची सहा झाडे, दोन हजार ७०० ग्रॅम गांजा असा ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे विशेष पथक अकोट शहरात पेट्रोलिंग करीत असताना, धारूर शाहनूर शेतशिवारात रामेश्वर तायडे (२७) याने मादक अमली गुंगीकारक पदार्थ गांजाची झाडे लागवड केली आहे. त्या झाडांचा गांजा काढून तो विक्री करीत आहे. अशा खात्रिशिर माहितीवरून पंच व पोलिस कर्मचाऱ्यांसह रामेश्वर तायडे याच्या शेतशिवारात छापा मारला. त्याच्या शेतात सहा गांजाची मोठी झाडे अंदाजे पाच ते सहा फुट उंचीची विनापरवाना लागवड करून तो सांभाळत असल्याचे आढळून आले. त्याच्या शेतातील घरात ही दोन हजार ७०० ग्रॅम गांजा विक्री करता ठेवला असल्याने आढळून आले. आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने केली.

    Post Views:  224


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व