इंगोले कुटुंबीयांनी ब्रेल बुक्स वाटून केला वाढदिवस साजरा दिव्यांग सोशल फाउंडेशन चा सामाजिक उपक्रम


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  02 Apr 2024, 9:03 AM
   

अकोला :  ३१ मार्च २०२४ स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहे. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांना ब्रेल बुक्स , व्हीलचेयर , व्हाईट केन व शिष्यवृत्ती वाटप करून दिव्यांगांच्या शिक्षणासाठी संस्था निरंतर कार्य करीत आहे. याच सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून नुकताच श्री उमेश विलास इंगोले व त्यांची पत्नी रेश्मा इंगोले यांनी आपली मुलगी ऊर्वी इंगोले हिचा वाढदिवस दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सहकार्याने  अंध विद्यार्थ्यांना ब्रेल बुक्स वितरित करून साजरा केला . विविध समाज माध्यमावर दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन इंगोले कुटुंबीयांनी संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांची भेट घेऊन आपल्या मुलीचा वाढदिवस सामाजिक पद्धतीने साजरा करावयाचा आहे असे सांगितले . इंगोले कुटुंबीयांची सामाजिक जाणीव पाहून डॉ.कोरडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे कुटुंबीयांचा सत्कार केला . इंगोले कुटुंबीयांनी दिलेली ब्रेल पुस्तके संस्थेतर्फे गरजू अंध विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली विशेष म्हणजे ही ब्रेल पुस्तके सामान्य पुस्तकांपेक्षा महाग असून मुंबई व देहरादून येथे ब्रेल प्रिंटिंग प्रेस मध्ये निर्माण केली जातात . या सामाजिक वाढदिवस सोहळ्यात मंदा विलास इंगोले यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सामाजिक उपक्रमांना शुभेच्छा दिल्या . आगळावेगळा वाढदिवस साजरा केल्यामुळे इंगोले कुटुंबीयांना अत्यानंद झाल्याची प्रतिक्रिया रेश्मा इंगोले यांनी व्यक्त केली . उमेश इंगोले यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्यत्व स्वीकारले . समाजातील सर्व घटकांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सामाजिक उपक्रमात भरभरून सहकार्य करावे . ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेयर , ब्रेल बुक्स , व्हाईट केन व शिष्यवृत्ती हवी आहे त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान केले .कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अरविंद तिडके ,सरोज तिडके , अस्मिता मिश्रा , अनामिका देशपांडे , विजय कोरडे , पूजा गुंटीवार , नीता वायकोळे व निखिल गवई यांनी सहकार्य केले .

    Post Views:  332


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व