मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण- भावना गवळी


 विश्वप्रभात  02 Jul 2024, 10:04 PM
   

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी विधानपरिषदेची उमेदवारी दिली. मला मागच्या वेळेस लोकसभेला उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामध्ये विविध कारणे असतील. काही कारणे असतील, असं राजकारणामध्ये असतं, पण आज शिंदे साहेब माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. लाडकी बहिण योजना सरकारने राबवली. तसं मी म्हणेन की, मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण आहे, असे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी खासदार भावना गवळी म्हणाल्या. विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.  

भावना गवळी म्हणाल्या, विधानपरिषदेचे सभागृह माझ्यासाठी नवीन आहे. मी लोकसभेवर अनेक वेळा निवडून गेले. त्यामुळे लोकसभेचे सभागृह अनेक वर्ष पाहिलेलं आहे. विधानपरिषद नवीन जरी असली, तरी सर्वांच्या सहकार्याने गाजवणार आहे. भावना गवळी यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळेस निवडून आल्या होत्या. मात्र, लोकसभा  निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं. भावना गवळी यांना उमेदवारी न देता राजश्री पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. मात्र, ठाकरेंच्या शिवेसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांनी राजश्री पाटील यांचा दारुण पराभव केला. दरम्यान, भावना गवळींचे तिकीट कापण्यात आल्यानंतर भाजपच्या दबावामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही, असंही विरोधी पक्षाकडून म्हटलं गेलं होतं. मात्र, भावना गवळींना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन एकनाथ शिंदेंनी त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे.  

    Post Views:  114


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व