टाकळी जाहगिर ग्रामपंचायत मध्ये बोगस कागदपत्रांवर कामे...शासन निधीची लूट


 विश्वप्रभात  27 Jul 2024, 5:46 PM
   

देगलूर- देगलूर तालुका टाकळी जाहगिर येथील जमिनीमध्ये मनमानी  बोगस नमुना ८ प्रमाणे जलजीवन मिशन योजना चालू करून शासन व प्रशासन व शेत मालकाची फसवणूक करीत आहे.शेतमालकाने जाऊन विचार पूस केली सता तुमची जमिन कुठली आहे अशी उडवाउडवीची भाषा व धमकी सरपंच बाईचा मुलगा हाणंमत परतवाड, उपसरपंच अर्जुन गायकवाड, गुत्तेदार सोहेल कंट्रोकशन व ग्रामसेवक गायकवाड मॅडम, यांनी दिली आहे.
      शेत मालक शांताबाई लक्ष्मण तलवारे यांच्या नावे 91गट क्रमांक मध्ये 81आर जमीन असून कुठल्याच लेखी स्वरूपात कागदपत्रे न देता सुध्दा मनमानी पध्दतीने पैशाच्या लालची पोटी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, गुत्तेदार, शेतमालकाच्या मालकी जागेवर जलजीवन मिशन योजना राबवत आहेत. हा भ्रष्ट्राचार थांबला पाहिजे म्हणून शेतकरी शांताबाई लक्ष्मण तलवारे यांनी पाणी पुरवठा विभाग ग्रामीण नांदेड ला आर्ज दिलेला आहे. देगलूर पाणी पुरवठा विभाग ला सुध्दा याबाबत कळविले आहे‌.बांधकाम विभाग जि प देगलूर यांनाही अर्ज दिल्यानंतर सुध्दा  आजपर्यंत चौकशी झालेली नाही.माहिती अधिकारातून सुध्दा अजून माहिती  मिळाली नाही. त्याच प्रमाणे जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी चे बोगस बांधकाम करून बिल काढण्यात आलेले आहे.याबाबत यांची स्टेटमेंट व ठराव व ईतर माहिती मागितली  सता 1गटविकास अधिकारी पं स देगलूर , विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, गट शिक्षणाधिकारी, बांधकाम विभाग जि प देगलूर माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. या टाळाटाळीबाबत आणि माहिती दडवल्याप्ररकरणी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी.अन्यथा याबाबत मंत्रालयीन स्तरावर न्याय मागण्यात येईल. असा इशारा प्रतिनिधी कॉम्रेड ईश्वर तलवारेयांनी दिला आहे.

    Post Views:  649


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व