सोलापूर : महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या मागणीसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३७ आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळेल, अशी शक्यता वर्तविली गेली. पण, एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटविल्यानंतर बंडखोर आमदारांचा संपूर्ण गट (शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतियांश) दुसऱ्या पक्षात विलीन करणे किंवा शिवसेनेतच राहणे अथवा राजीनामा देणे, हे तीन पर्याय राहिल्याचे शिवसेनेच्या टेक्निकल टिमने स्पष्ट करीत जिल्हाप्रमुखांच्या मनातील संभ्रम दूर केला.
पक्षप्रमुखांचे जिल्हाप्रमुखांना भावनिक साद
शिवसेनेला बंडखोरी काही नवीन नसून आतापर्यंत तीनवेळा तशा प्रसंगाला शिवसेना सामोरे गेला आहे. तरीही, राज्याच्या राजकारणात शिवसेना मजूबत उभी आहे. त्यासाठी आमदार, खासदारांपेक्षाही माझे शिवसैनिक, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांचे बळ महत्त्वाचे ठरले आहे. पण, मी सत्तेला चिकटून बसलेलो नाही, मुख्यमंत्रीपदाचा आता राजीनामा देईन, वर्षा बंगला सोडला आहे. कोणत्याही शिवसैनिकाने समोर येऊन म्हणावे, तुम्ही राजीनामा द्या, लगेचच राजीनामा देतो, असे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) स्पष्ट केले. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांना माझ्यावर भरोसा नसल्यास, तेही माझी साथ सोडू शकतात, कोणालाही बंधनात अडकविणार नाही, अशी भावनिक साद त्यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घातली.
बंडखोरांसमोरील तीन पर्याय
१) एकूण संख्याबळाच्या दोन तृतियांश आमदारांच्या गटाला दुसऱ्या पक्षातच विलीन व्हावे लागेल
२) शिंदे हे पक्षाचे अधिकृत गटनेते नसल्याने बहुमत सिध्द करताना त्यांना पक्ष कोणता, याचे उत्तर द्यावे लागेल
३) पक्ष किंवा स्वतंत्र गट म्हणून त्यांना कामकाज करता येणार नसल्याने द्यावा लागेल राजीनामा
Post Views: 311
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay