लोकस्वातंत्र्यकडून ज्येष्ठ पत्रकार स्व.नि.ग. पाटील यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट व श्रध्दांजली!
२३ नोव्हेंबरच्या मासिक कार्यक्रमात दिली जाणार सामुहिक श्रध्दांजली..!
अकोला : नगर परिषद अकोलाचे कर्मचारी असलेले व सेवानिवृत्ती नंतर दैनिक महासागर, दैनिक विश्व शिवशक्ती, दैनिक हिंदुस्थान अकोला आवृत्तीचे संपादकिय प्रमुख अशी जबाबदारी पार पाडून निर्भीड पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार स्व. नि .ग. पाटील यांचे ३ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या १०५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचे निवासस्थानी निवारा कॉलनी, गोरक्षण रोड, अकोला येथे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकार्यांनी सांत्वन पर भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे. यानंतर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दि.२३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सुध्दा प्रामाणिक समाजसेवी पत्रकार स्व नि.ग.पाटील यांना उपस्थित सर्वांकडून सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे.
यावेळी त्यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, केंद्रीय सल्लागार पुष्पराजदादा गावंडे, वैद्यकीय विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय देशमुख (कंझरेकर), संघटनेचे सभासद डॉ. अशोक शिरसाट, एजाजभाई खान, सह संघटक संतोष मोरे, तुषार हांडे, जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, आदींची उपस्थिती होती. त्यांचे तिन्ही नातू निलेश सुभाष पाटील, हरीष पाटील, सतीष पाटील यांनी आजोबांच्या आठवणी सांगीतल्या, शेवटपर्यंत ठणठणीत जीवन जगणार्या ज्येष्ठ पत्रकार स्व. नि. ग. पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Post Views: 106