शिक्षा एवं संस्कृती संमेलनात डॉ. रवींद्र भोळे सन्मानित
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
25 Jul 2023, 9:11 AM
दिल्ली : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना विविध क्षेत्रात समर्पित भावनेने निष्काम कर्मयोगी कार्य केल्याबद्दल पद्मश्री डॉ. सुकामा आचार्य यांच्या हस्ते शिक्षा एवम संस्कृती संमेलनात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. व्हीआयपी उपस्थितांमध्ये केंद्रीय मंत्री बी एल वर्मा जी, पूर्व मंत्री राजश्री ठाकूर विक्रम सिंह जी, राष्ट्रीय पार्टी चे अध्यक्ष अनुरागसिंह यादव जी, सनातन धर्माच्या गुरु मा पूजा जी,, युवा प्रेरक तन्मय त्यागी जी गझियाबाद, निर्देशक रवींद्र कुमारजी अध्यक्ष सर्वेश्वर महादेव ज्योतिर्लिंग धाम, वेद आचार्यजी, डी सर्व दमन, सह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ.रवींद्र भोळे यांनी मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, डॉक्टर मनीभाई देसाई प्रतिष्ठान निती आयोग सलग्नित दिल्ली ह्या संस्थांच्या सहकार्याने समर्पित भावनेने कार्य केलेले आहे. तसेच राज्यभर सामाजिक, धार्मिक ,वैद्यकीय ,अपंग , नैसर्गिक आपत्ती, वृक्षारोपण इत्यादी क्षेत्राशिवाय व्यसनमुक्ती प्रवचनाद्वारे प्रबोधन कम्युनिटी हेल्थ वर्क इत्यादी क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. डॉ.
रवींद्र भोळे यांच्या समर्पित भावनेने निष्काम कर्मयोगी कार्य केल्याबद्दल त्यांना वरील हा शिक्षा एवं संस्कृती संमेलनात वरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.
Post Views: 143