पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून १०४ गुन्हे उघडकीस
पाचोरा येथून पिडीत मुलगी आणि आरोपी ताब्यात
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Oct 2023, 10:25 AM
अकोला - अकोला पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आतापर्यंत ७१ गुन्हे आणि हरविल्याच्या प्रकरणातील ३३ असे भा.दं.वी.च्या कलम ३६३ आणि ३६६(अ) नुसार तपासाअंती एकून १०४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे.
पोलिस स्टेशन बार्शीटाकळी येथून नोंदविलेल्या भा.दं.वी. च्या कलम ६२४ /२०२२ व ३६३ व ३६६ मधील आरोपी व पिडीत मुलगी हरविल्याच्या प्रकरणातील शोधामध्ये, मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा,जि.जळगाव पोलिसांच्या मदतीने पाचोरा येथून आरोपी व पिडीतेला ताब्यात घेण्यात आले.त्यांना पुढील कार्यवाहीसाठी बार्शीटाकळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.संदिप घुगे, अप्पर पोलिस अधिक्षक श्री अभय डोंगरे,व शहर विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी श्री.सुभाष दुधगावकर,यांचे मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. याकामी पोलिस उपनिरीक्षक श्री विजय खर्चे यांचेसोबत हे.कॉ.सुरज मंगरूळकर, धनराज चव्हाण, मपोकॉ.पूनम बचे, निकिता चौरे, वाहन चालक पोकॉ.अविन्द्र खोडे यांनी तपास कामी सहकार्य केले. ईतर गुन्ह्यातील पिडीता आणि आरोपींचाही तपास करण्यासाठी कसून शोधकार्य सुरू आहे.
Post Views: 120