अकोला : अकोला नगरीतील आरोग्यविषयक उपक्रमात तसेंच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुपरिचित व्यक्तिमत्त्व तसेच जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे सक्रिय सदस्य डॉ . राजेश अग्रवाल ह्यांची राज्यस्तरीय विशेष आरोग्य मदत कक्षाच्या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा समितीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. ह्या संबंधीचे महाराष्टाचे माननीय राज्यपाल ह्यांचे स्वाक्षरी पत्र शासन पत्र 14 मार्च 2024 रोजी जारी करण्यात आले.
त्यांच्या ह्या नियुक्तीबद्दल जनरल प्रॅक्टिशनर्स अससोसिअशन अकोलाच्या वतीने स्थानिक स्वर्गीय डॉ .सौ. चारुशीला काळे मेमोरियल जीपीए हॉल येथे रविवारी ,१७ मार्च २०२४ रोजी हृद्य सत्कार जीपीएचे मार्गदर्शक डॉ .किशोर मालोकार यांचे शुभहस्ते , जीपीए अध्यक्ष डॉ . सतीश उटांगळे , जीपीए सचिव डॉ. विनय दांदळे।ह्यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला ..
मी आतापर्यंत केलेल्या आरोग्यविषयक उपक्रम राबविणे तथा केलेल्या सामाजीक कार्याची ही पावती आहे , असे डॉ . राजेश अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले . प्रमुख अतिथी डॉ . किशोर मालोकार यांनी डॉ . राजेश अग्रवाल यांच्या कार्याचे कौतुक केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जीपीए अध्यक्ष डॉ . सतिश उटांगळे यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीपीए सचिव डॉ.विनय दांदळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जीपीए कोषाध्यक्ष डॉ . आदित्य नानोटी यांनी मानलेत ..ह्या कार्यक्रमास जीपीए चे सदस्य डॉ . अशोक ओळंबे ,
डॉ. चंद्रकांत वाघमारे , डॉ . संजय अग्रवाल , डॉ..शैलेश कोठारी ,डॉ . वर्षा राव , डॉ. सौ. इंगळे , डॉ . संजय अग्रवाल ,
डॉ . खडसे , डॉ. विक्रमसिंग चव्हाण , पातूर , डॉ . मारोतकर ,डॉ. अरुण पारिक ,
डॉ . ज्योती आगे ,डॉ.हर्षदसायानी ,अजय सुरटकर यांचेसह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते .
Connection failed: Operation not permitted