जिल्ह्यात 17 सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा पंधरवडा
स्वच्छता ही सेवा उपक्रम लोकचळवळ व्हावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
15 Sep 2024, 6:36 PM
अकोला, दि. 13 : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा मोहिम जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येत आहे. हा उपक्रम लोकचळवळ व्हावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. अभियानाच्या अंमलबजावणी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिका-यांची ऑनलाईन बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी उपस्थित होते.
Post Views: 70