पत्रकारांनी जाहिराती आणि योजनांच्या लाभासाठी शासकीय निकषांचे पालन करावे
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
19 Oct 2022, 9:40 AM
अकोला-- वृत्तपत्रांना जाहिरातींचे आर्थिक पाठबळ आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीच माहिती व जनसंपर्क विभाग कार्यरत असून पत्रकारांनी शासकीय नियमांचे पालन करून त्या निकषांना अनुसरून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत रहावे.जाहिराती पत्रकार कल्याणाच्या योजनांचा जास्तीत लाभ घेण्यासाठी निकषांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलींद दुसाने यांनी केले.अकोला येथे जठारपेठेतील जैन रेस्ट्रोमध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या १४ व्या मासिक विचारमंथन तथा स्नेहमिलन मेळाव्यात ते अध्यक्षिय भाषणातून बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सातारा येथील जेष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर व माधवबाग उपचार केन्द्राच्या संचालिका डॉ.सौ.कल्याणी बेलोरकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम कार्यक्रमांच्या नियमित पद्धतीप्रमाणे सामाजिक साधनेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समजोध्दारक गाडगे महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण करून वंदन करण्यात आले.डॉ.मिलींद दुसाने, डॉ.कल्याणी बेलोरकर व संघर्षशील जीवनातून वाटचाल करीत नंतरच्या योग्य काळात संघटनेला आर्थिक सहकार्य करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ जेष्ठ पत्रकार अंबादास तल्हार यांचा सन्मानपत्र,शाल व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.संस्थापक- अध्यक्ष संजय देशमुख यांची अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याबद्दल पदाधिकारी व सभासदांकडून त्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ.सौ.कल्याणी बेलोरकर यांनी आहार,विहार,व्यायाम व नियमित योग्य जीवनशैलीने मधुमूह, रक्तदाब आणि तत्सम त्रासदायक व धोकादायक आजार कसे टाळले जातात. ते कसे उद्भवतात व माधवबागच्या उपचार पध्दतीने ते कसे नियंत्रित केले जातात यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले.या उपचार पध्दतीने बायपास आणि अॕंन्जिओप्लास्टीसारख्या अनेक जटील महागडे उपचार कसे टाळल्या जातात याबाबत विस्तृत माहिती दिली.संजय देशमुख यांनी वाटचालीची माहिती देऊन संघटनेचा नोव्हेंबरचा विचारमंथन मेळावा रुद्रायणी येथे राहणार असल्याचे यावेळी सांगीतले.
केन्द्रीय कोषाध्यक्ष सिध्देश्वर देशमुख यांचे संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमास उपाध्यक्ष प्रदिप खाडे, किशोर मानकर सचिव राजेन्द्र देशमुख, पुष्पराज गावंडे, सौ.जया भारती, विदर्भ संघटक डॉ.शंकरराव सांगळे, अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके, कार्याध्यक्ष नंदकिशोर चौबे, सहसचिव सागर लोडम, मंगेश चऱ्हाटे, राहूल राऊत, मनोज देशमुख, सौ.दिपाली बाहेकर, सतिश मा.देशमुख, सुरेश तिडके, पसायदानचे संपादक प्रा.सुरेश कुलकर्णी, सतिश अ.देशमुख, पंकज देशमुख व ईतर सभासद उपस्थित होते. आभारप्रदर्शन सौ.जया भारती यांनी केले.
Post Views: 242