स्वातंत्र सेनानी गोपाळराव देशमुख यांचे चिरंजीव महाबीज चे मा.सह महाव्यवस्थापक के.जी.देशमुख कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Jan 2025, 12:30 PM
   

अकोला प्रतिनिधी:- भारतीय कृषक समाज नवी दिल्ली च्या वतीने 27 डिसेंबर 2024 ला सकाळी 11 वाजता कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव ता.जुन्नर जि.नाशिक येथे डॉ.पंजाबराव देशमुख यांची 126 जयंती निमित्त,शेतकरी मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा भारतीय कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कृष्णवीर चौधरी, राष्ट्रीय उपाध्यक्ष लिंगराज पाटील बेळगाव,  संचालक गिन्नी ऍग्रो नागपूर, कृषिरत्न मंडळ नारायणगाव चे अनिल मेहेर, डॉक्टर प्रकाश सिंह सूर्यवंशी प्रगतशील शेतकरी वाराणसी भारतीय कृषक समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष नलंगे, यांच्या मार्गदर्शनात आयोजित शेतकरी मेळावा व जलरत्न, कृषिरत्न, कृषी भूषण व उद्योग भूषण पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
         राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कृष्ण वीर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126 व्या जयंती व शेतकरी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय कृषक समाजाचे अमरावती विभागीय अध्यक्ष तथा महाबीजचे मा.सह महाव्यवस्थापक, निर्माण मल्टीस्टेट बँकेचे उपाध्यक्ष,गोट बँक कारखेड चे मा.उपाध्यक्ष के.जी.देशमुख यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांची सेवा व अनेक संस्थात केलेल्या भरीव कामाबद्दल त्यांना मानचिन्ह, शाल, श्रीफळ व कृषिरत्न पुरस्कार देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कृष्णवीर चौधरी महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्र नलंगे, महिला प्रभारी ज्योती सुरोसे, राज्य महिला अध्यक्षा स्वाती बोरीकर आदी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. विदर्भातील अनेक जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित होते.त्यात अकोला जिल्हाध्यक्ष विश्वासराव देशमुख, विभागीय उपाध्यक्ष विनय निचड,विभागीय कार्याध्यक्ष विजय बाहाकर, अकोला महीला अध्यक्ष दुर्गा भड, श्री गिऱ्हे साहेब, देशमुख साहेब सचिव रमेश बोचरे साहेब,अमरावती महीला अध्यक्ष सपना तायडे, इत्यादी पदाधिकारी हजर होते.
       स्वातंत्र्य सेनानी गोपाळराव देशमुख यांनी आपल्या वाड्यात स्वातंत्र्यपूर्व काळात 1943 ला भूमिगत एक एक महिना शिबिरे घेऊन महाराष्ट्रातील चळवळ सक्रिय केली. अशा देशभक्त वडिलांची प्रेरणा घेऊन केशवराव समाज सेवा करत आहेत. आई सुशिलाबाई आणि गोपाळराव देशमुख पोटी यांच्या 24 जून 1951 ला जन्म घेतला.केशवराज महाराज यांच्या कृपा प्रसादाने जन्म घेतला अशी आईची धारणा असल्याने  आईने केशव ठेवले.
      केशवराव यांचे  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शासकीय उच्चबुनियादी  शाळा उगवा ता.जि.अकोला येथे झाले. ते खोखो,हॉलीबॉल कबड्डी स्पर्धेत व वैयक्तिक खेळात नेहमी भाग घेत. त्यांनी अनेक शिल्ड आणि ट्रॉफी शाळेसाठी खेचून आणल्या. पुढील शिक्षणासाठी ते अकोला येथे शिवाजी हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. स्वातंत्र सेनानी यांचे चिरंजीव म्हणून त्यांना स्कॉलरशिप मिळायची त्यांनी एम. एसस्सी केले.
     त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून जातपात, धर्म न पाळता समाजासाठी ते सतत काम करीत असतात.के.जीं नी  सुरुवातीला अकोट पंचायत समिती विस्तार अधिकारी म्हणून काम केले.  स्व.नानासाहेब सपकाळ मंत्री असताना त्यांची मुंबईला अचानक भेट झाल्यावर त्यांनी तू गोपाळराव यांचा मुलगा.. तू महाबीज ला अर्ज कर, कामाचा अनुभव म्हणून त्यांना क्षेत्रिय अधिकारी म्हणून अकोला येथे नेमणूक मिळाली. महाबीजचे सह. महाव्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी महाबीज च्या माध्यमातून महाराष्ट्रभर सेवा केली इतर राज्यातील त्यांनी सेवा दिली.
          धर्मपत्नी सौ.शोधनाताई मोठ्या घराण्यातल्या असून सुद्धा शांत, संयमी आणि केशवराव यांच्या मागे सावली सारख्या असतात आणि के.जी.ना समाजसेवेत मदत करतात. के.जी.देशमुख हे निर्माण मल्टीस्टेट बँकेचे उपाध्यक्ष आहेत, तसेच गोट बँक कारखेड चे उपाध्यक्ष म्हणून काम केले, गोरगरिबांना कमी खर्चात शिक्षण मिळावे म्हणून  शिक्षण संस्था स्थापन करून  कॉन्व्हेंट चालू आहे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे तेही संस्थापक अध्यक्ष आहेत ते अनेक संस्थावर याही वयात नव तरुणाप्रमाणे सतत काम करीत असतात.
      समाजासाठी काहीतरी करावे ही त्यांची नेहमी भावना असते. त्यांचे गुण हेरून भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष डॉक्टर सुभाष नलंगे साहेब आणि टीमने कृषिरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली. त्यांना कृषिरत्न पुरस्कार दिल्याबद्दल भारतीय कृषक समाजा वतीने अकोला च्या वतीने आम्ही आभारी आहोत. के.जी देशमुख यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या हातून शेतकऱ्यांची सेवा घडो. कृषिरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अकोला च्या वतीने सुद्धा डॉक्टर प्रकाश सिंह रघुवंशी प्रगतिशील शेतकरी वाराणसी कृषी प्रमुख सल्लागार भारतीय कृषी समाज यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याध्यक्ष सुभाष नलंगे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे असे विभागीय कार्याध्यक्ष विजय बाहाकर कळवितात.

    Post Views:  76


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व