बबनराव पाचपुते यांच्या जन्मदिनी जनसमस्या संवादासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन


 विश्व प्रभात  08 Sep 2024, 1:31 PM
   

जिल्हा प्रतिनिधी: वैभव हराळ 
विधानपरिषदेत तब्बल ७:वेळा वेगवेगळ्या चिन्हा़वर निवडून येणारे अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रिय यशस्वी राजकीय नेते,आमदार व माजी मंत्री  मा.बबनराव पाचपुते यांचा ७०वा वाढिवस नुकताच साजरा करण्यात आला.आपली राजकीय कारकीर्द जनतेसाठीच खर्ची घालणाऱ्या बबनराव पाचपुते औंढा जन्मदिन जनसमस्या आणि पत्रकारांसोबत संवाद अशा अभिनव उपक्रमाने साजरा केला जातै.यानिमित्त  छोटीशी पत्रकार परिषद भरवण्यात आली होती..दादांचा जन्मदिवस दर वर्षी मोठा साजरा करण्यात येतो आणि या माध्यमातून कार्यकर्त्यांसोबत सामाजिक कामासंदर्भात  संवाद साधला जातो. जन्म दिवस फक्त निमित्तमात्र असतो.परंतू लोकांशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी वापरला जाणारा जन्मदिवस समारंभ असतो.असा यामागील उध्देश  ठाम वक्तव्य विक्रम सिंह पाचपुते यांनी स्पष्ट केला.
     श्रीगोंदा येथून रस्ता पाणी विज पुरवठा हा उपक्रम बबनराव पाचपुते यांनी पूर्ण केला आहे. गेले कित्येक वर्ष जनतेची सेवा ही आमदार म्हणून आणि वनमंत्री पदाच्या माध्यमातूनही त्यांनी केली. तसेच आम्ही जरी पक्ष बदलले असले तरी जनतेची कामे आणि सेवा देखील केलेलीच आहे. आजपण चालू असताना सुद्धा कार्यक्रम आणि श्रीगोंदा तालुक्यात कित्येक कामे मंजूर करून पूर्ण केरून घेतली आहेत. प्रथम प्रश्न रस्ता हा होता तर ५०० ते ६००कि. मी. चालू झाला असून गावोगावी वाड्या वस्त्यासाठी विज पाणी रस्ते मंजूर करून दिले आहेत सर्वच प्रकारच्या पण  योजना राबविल्या जात आहेत.लोकनियुक्त सरपंच त्यांच्या हद्दीतील कामाची निगराणी आणि देखभाल काम हे करत असताना काही कामांत निकृष्टता आढळून आल्यास आम्हाला सांगावे. म्हणजे आम्ही काम व्यवस्थित आणि टेंडर प्रमाणे करू अशी प्रतिक्रिया विक्रम सिंह पाचपुते यांनी व्यक्त केली. आम्हाला कामाचे स्वरूप पाहून काम करावे लागते.माहिती आणि पाहणी केल्या नंतर त्यात दुरुस्ती करून कामे संबधित कॉन्ट्रॅक्टर यांना सूचित करावे लागते. 
      शहरी आणि ग्रामीण विकास करण्यास एम आय डी सी मंजूर करण्यात आली आहे. परंतु आराखडा तयार नसल्या कारणाने कामे थांबली आहेत. सर्वच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू पण आपण मला किंवा पाचपुते यांना सहकार्य करावे असे स्पष्ट मत मांडले. दादांची शारीरिक परिस्थिती सुधारली आहे. गेले कित्येक वर्ष आपण सहकार्य केले आहे. असेच सहकार्य करावे म्हणजे पुढील कामे मार्गी लागतील.असे यावेळी विक्रमसिंह पाचपुते म्हणाले.

    Post Views:  263


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व