छावा संघटनेच्या शिबिरात 75 गावकऱ्यांनी केले रक्तदान


 विश्वप्रभात  14 Apr 2025, 10:22 PM
   

अकोला....... येथून जवळच असलेल्या तांदळी येथे  छावा  संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 75 गावकऱ्यांनी  रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व सिद्ध केले . सध्या रक्तदानाची अत्यावश्यक गरज लक्षात घेऊन  छावा संघटनेतर्फे रक्तदान शिबिरांवर विशेष भर देण्यात येत असतो. त्यानुसार छावाचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे यांच्या पुढाकाराने  सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते 
                प्रत्येक वर्षी 14 मे रोजी छावा संघटनेतर्फे छत्रपती संभाजी राजे यांची जयंती भव्य प्रमाणात विविध कार्यक्रमासह साजरी करण्यात येत असते. या कार्यक्रमाची जनजागृती करण्याच्या हेतूने व युवकांचा उत्साह वाढविण्याकरिता  छावा संघटनेतर्फे एक महिना आधीपासून ग्रामीण भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार तांदळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या विविध कार्यक्रमांसाठी शंकरराव वाकोडे यांचे नेतृत्वाखाली छावाचे जेष्ठ मार्गदर्शक  डॉ. दीपक मोरे, डॉ. श्रीराम लाहोळे, डॉ. संजय सरोदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, अरविंद कपले, अमोल हिंगणे, निवृत्ती वानखडे,अनिरुद्ध भाजीपाले, बबलू वसु, आशु वानखडे यांचे सह इतरही सर्वच पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत असतात.
                  तांदळी येथे पार पडलेल्या या शिबिरात अतिशय उत्साहाने  75 युवकांनी रक्तदान केले. सदर शिबिरात शंकरराव वाकोडे यांचे सह स्त्रियांच्या जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी आप्पासाहेब डामरे, अमोल हिंगणे, आशु वानखेडे पैलवान, डॉ. प्रफुल्ल शिरसाट, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस पी जोशी, रक्त संकलन अधिकारी  डॉ. खान व त्यांचे सहकारी तसेच भिकाजी धोत्रे, चंद्रकांत अंधारे, गजानन शेंडे, दत्तात्रेय बरडे, शिवलाल पाटील, गोपाल पाटकर, प्रथमेश पाटील, विठ्ठल काळे, मंगेश गाडगे, नितीन वानखडे, सोनू गिरी, शंकर गोळे यांचे सह इतरही गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

    Post Views:  66


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व