साजिद खान पठाणसह तिघांना जामीन मंजूर
अकोला : महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग रचनेवर आक्षेप घेत महापालिकेतील अधिकाऱ्यांना कक्षामध्ये डांबून ठेवून त्यांच्याशी असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी विरोधी पक्षनेत्यासह तिघांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग रचनेवर आक्षेप घेत महापालिकेतील अधिकाऱ्यांना कक्षामध्ये डांबून ठेवून त्यांच्याशी असभ्य वर्तणूक केल्याने सिटी कोतवाली स्टेशनला महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, मोहम्मद इरफान, नगरसेवक मोंटू खान, महेंद्र डोंगरे, नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर, नौशाद खान, गुड्डू पठाण, जमीन बर्तनवाले, फिरोज खान नवाब उर्फ बाबा यांच्याविरोधात भादवि कलम 143, 147, 153अ, 186, 188, 269, 323, 342, 353, 427, 504, 506(2), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 135, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, मोहम्मद इरफान, नगरसेवक मोंटू खान यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तिवाद एकूण 20 हजार रुपये, पोलीस स्टेशनला हजर राहणे, फिर्यादिवर दबाव न टाकने या अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावतीने ॲड. राजीव जाधव यांनी बाजू मांडली.
Post Views: 260