अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अकोलाच्या वतीने स्वामी विवेकानंद पुण्यतिथी तथा वरिष्ठ मार्गदर्शकांचा सत्कार समारंभ
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
05 Jul 2024, 9:50 AM
अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अकोला च्या वतीने गुरुवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी दुपारी ४.३० वाजता स्वर्गीय भाऊसाहेब लहाने सभागृह केशवनगर अकोला येथे स्वामी विवेकानंद यांची 122 वी पुण्यतिथी तथा ग्राहक पंचायतीचे जेष्ठ मार्गदर्शक यांचा सत्कार अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे वतीने अकोला जिल्हा शाखा संस्थापक वय अवघे ९२+ श्री सुधाकर रावजी जकाते यांचे अध्यक्षतेखाली तथा प्रमुख अतिथी जिल्हाध्यक्ष श्री मनजीत देशमुख संघटन मंत्री श्री दिनेश जी पांडे सचिव श्री प्रमोद बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी तथा सत्कार समारंभ संपन्न झाला.
11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथील आजच्या आर्ट इन्स्टिट्यूट च्या जागेवर पहिल्या जागतिक धर्म संसदेत स्वामी विवेकानंद यांनी "बंधू आणि भगिनींनो" म्हटल्यावर सर्व सभागृह आश्चर्यचकित होऊन स्वामी विवेकानंद माझ्याच कुटुंबातल्या सदस्य असल्याचा त्यांना भास झाला आणि त्यांनी सर्वांचे मने जिंकली हिंदू धर्म त्यांनी सातासमुद्रापलीकडे अठराव्या शतकात नेला.
ज्यांना आपल्या विचारासाठी आठव्या वर्गातून शाळा सोडावा लागली तरी जिद्दीने त्यांनी एअर फोर्स, जिल्हा परिषद मध्ये इंजिनियर म्हणून कार्य करून एसटी महामंडळातून इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झालेले श्री सुधाकररावजी जकाते यांनी अकोला जिल्ह्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची शाखा अकोला जिल्ह्यात स्थापन करून त्याचे वटवृक्षात रूपांतर केले, अनेक जिल्हा,राज्य व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे चे कार्यक्रम त्यांनी अकोला जिल्ह्यात घेतले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी स्वामी विवेकानंद यांनी मूर्ती पूजेचे महत्व जगभर आणि भारतात पटवून दिल्याचे आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील अनेक किस्से त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
संघटन मंत्री श्री दिनेश जी पांडे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली.सर्वश्री विजय बाहाकर, सह संघटन मंत्री श्री मनोज अग्रवाल यांनी ग्राहक गीत ,मनोहर गंगाखेडकर, सुधाकरराव पिंपळगावकर, श्री कुलकर्णी आदींनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
ज्येष्ठ मार्गदर्शक श्री सुधाकरराव पिंपळगावकर, श्री कमलाकर कुलकर्णी श्री मनोहरराव गंगाखेडकर यांचा शाल, श्रीफळ बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सर्वश्री सुधाकरराव जकाते, मनजीत देशमुख, दिनेश पांडे, प्रमोद बोरकर, विनोद मेहरे, सुनील बाळापुरे, शरद यादवडकर ,विजय बाहाकर,दीपक वैष्णव, मनोहर गंगाखेडकर, अर्चना विटकरे, प्रकाश विटकर ,मनोज कुमार अग्रवाल ,कमलाकर कुलकर्णी, पुनम देशपांडे ,सौ मीनाक्षी अमोल पवार ,सौ प्राजक्ता सपकाळ ,भावेश वाघमारे ,गुरुदेव आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे बहारदार संचलन अँड.पुनम देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री मनजीत देशमुख यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली असे विजय बाहाकर कळवितात.
Post Views: 127